Stroke-Heart Attack Risk in Winter: थंडीत बाथरूममध्येच जास्त हृदयविकाराचा झटका का येतो? जाणून घ्या कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Stroke-Heart Attack Risk in Winter

Stroke-Heart Attack Risk in Winter: थंडीत बाथरूममध्येच जास्त हृदयविकाराचा झटका का येतो? जाणून घ्या कारण

Stroke-Heart Attack Risk in Winter: हिवाळा सुरू झाला असून या हंगामात हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका सर्वाधिक असतो. जर तुम्हाला उच्च कोलेस्टेरॉल, उच्च किंवा कमी रक्तदाब, किंवा रक्त गोठण्याची समस्या असेल तर पक्षाघात आणि हृदयविकाराचा धोका दुप्पट असतो.

तुमच्या मनात हा प्रश्नही येतो का की, सर्वाधिक पक्षाघात किंवा हृदयविकाराचाची समस्या बाथरूममध्येच का उद्भवते, आंघोळ करताना एका छोट्याशा चुकीमुळे असे घडते आणि हा धोका केवळ उच्च कोलेस्ट्रॉल, रक्त गोठत असलेल्या रुग्णांनाच नाही तर कोणालाही होऊ शकतो.

आंघोळ करताना ही चूक टाळा

अंघोळ करताना जर तुम्ही पहिल्यांदा डोक्यावर पाणी ओतले तर ही चूक तुमच्यासाठी घातक ठरू शकते. अंघोळ करताना कोणत्याही ऋतूत आधी डोक्यावर पाणी टाकू नये. पाणी ओतण्याचा योग्य मार्ग म्हणजे प्रथम पायांवर, नंतर कंबरेवर, मानेवर आणि शेवटी डोक्यावर पाणी ओता.

थेट डोक्यावर थंड पाणी टाकल्याने शरीरातील शिरा आकुंचन पावण्याचा धोका असतो. ही रक्तवाहिनी आकुंचन पावल्यामुळे रक्ताभिसरण बिघडते आणि अचानक रक्तदाब वाढतो. थंड पाण्यामुळे डोक्याच्या शिरा आकसतात आणि रक्ताच्या दाबामुळे त्या अनेक वेळा फुटतात. यामुळे पक्षाघात होतो. त्याचबरोबर हृदयाला योग्य रक्तपुरवठा होत नसल्यामुळे हृदय दाब सहन करू शकत नाही.

रक्ताभिसरणावर काय परिणाम होतो

शरीरातील रक्ताभिसरण डोक्यापासून पायापर्यंत होते आणि थंड पाणी डोक्यावर पडताच रक्तवाहिन्या आकसतात आणि रक्ताभिसरण अतिशय मंद होते. यामुळे स्ट्रोक आणि अटॅकचा धोका वाढतो, कारण रक्त योग्य प्रकारे हृदयापर्यंत पोहोचत नाही.

अनेक वेळा थंड पाणी पडताच मेंदूच्या नसा फुटतात. यामुळे बाथरूममध्ये स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येण्याचा सर्वाधिक धोका असतो.

आंघोळ करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

आंघोळीसाठी बादली-मग वापरणे चांगले. प्रथम पायांवर पाणी टाका. हे शरीराला पाण्याच्या तपमानाशी परिचित करेल आणि त्याला धक्का बसणार नाही. पाय नंतर हळूहळू कंबर आणि खांद्यावर पाणी टाका त्यानंतर डोक्यावर पाणी ओता. यामुळे रक्ताभिसरण सामान्य राहील.

टॅग्स :heart attackhealth