esakal | मासिक पाळीमध्ये टॅम्पॉनचा वापर करताय?; होऊ शकतो टॉक्सिक शॉक सिंड्रोम
sakal

बोलून बातमी शोधा

पीरिअडमध्ये टॅम्पॉनचा वापर करताय?; होऊ शकतो टॉक्सिक शॉक सिंड्रोम

पीरिअडमध्ये टॅम्पॉनचा वापर करताय?; होऊ शकतो टॉक्सिक शॉक सिंड्रोम

sakal_logo
By
शर्वरी जोशी

गेल्या काही काळात स्त्रियांमध्ये टॉक्सिक शॉक सिंड्रोमची समस्या झपाट्याने वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. मासिक पाळी सुरु झाली की स्त्रियांना टॉक्सिक शॉक सिंड्रोमचा त्रास जाणवू लागतो. टॉक्सिक शॉक सिंड्रोम हे शरीरासाठी अत्यंत घातक असून स्टॅफिलोकोकस ऑरियस किंवा स्टॅफ या बॅक्टेरियांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर हा त्रास जाणवतो. विशेष म्हणजे ज्या महिला टॅम्पोनचा वापर करतात त्या स्त्रियांमध्ये ही समस्या निर्माण होत असल्याचं समोर आलं आहे. (womens-health-toxic-shock-syndrome-symptoms-treatment-ssj93)

टॉक्सिक शॉक सिंड्रोम झाल्यावर रक्तदाब झपाट्याने कमी होतो. त्यामुळे शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा होत नाही. अशावेळी अनेकदा ही समस्या प्राणघातकही ठरु शकते. अमेरिकेतील एका २४ वर्षीय मॉडलेचा २०१२ मध्ये टॉक्सिक शॉक सिंड्रोममुळे मृत्यू झाला होता. तिच्या शरीरात विषारी घटकांचं प्रमाण प्रचंड वाढलं होतं.

हेही वाचा: 'या' टीप्स फॉलो करा अन् चेहऱ्यावरील तेलकटपणा करा दूर

टॉक्सिक शॉक सिंड्रोम हा अनेकदा मेन्स्ट्रुअल स्पॉन्ज, डायाफ्राम व सर्वाइकल कॅप यांच्यामुळेही होऊ शकतो. अनेकदा बाळाचा जन्म झाल्यावरही स्त्रियांना टॉक्सिक शॉक सिंड्रोमची समस्या जाणवू शकते. तसंच साधारणपणे एखादी अॅलर्जी, सर्जरी, जखम झाल्यावर स्टॅफ बॅक्टेरिया त्यांच्या संपर्कात आले तर टॉक्सिक शॉक सिंड्रोम होऊ शकतो.

टॉक्सिक शॉक सिंड्रोम ही समस्या खासकरुन १९ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींमध्ये दिसून येते. तसंच ३० टक्के महिलांमध्ये ही समस्या वारंवार निर्माण होत असल्याचं समोर आलं आहे. अनेकदा या समस्येमध्ये हृदय आणि फुफ्फुस निकामी होण्याची शक्यता असते. त्यामुळे टॉक्सिक शॉक सिंड्रोमची लक्षण जाणवल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हेही वाचा: तुमचा व्हॅट्स अ‍ॅप DP कोण चोरुन पाहतंय माहितीये?

टॉक्सिक शॉक सिंड्रोमची लक्षणे -

अचानकपणे ताप येणे

रक्तदाब कमी होणे

हातापायांच्या तळव्यावर रॅशेज पडणे

विसराळूपणा

स्नायू दुखणे

डोळे, चेहरा लाल होणे

डोकेदुखी

दरम्यान, स्त्रियांच्या योनीमार्गाजवळ स्टॅफ बॅक्टेरिया असतो. प्रत्यक्षात या बॅक्टेरियामुळे कोणताही त्रास होत नाही. मात्र, टॅम्पॉनचा वापर केल्यावर हा बॅक्टेरिया शरीरात वेगाने पसरतो. त्यानंतर हळूहळू तो रक्तात मिसळतो. त्यामुळे टॅम्पॉनची निवड योग्यरितीने करणं अत्यंत गरजेचं आहे. सुती किंवा रेयॉन फायबरच्या तुलनेत पॉलिएस्टर फोम टॅम्पॉनमुळे स्टॅफ बॅक्टेरिया वेगाने पसरतो.

loading image
go to top