जागतिक ‘सीओपीडी’ दिन विशेष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जागतिक ‘सीओपीडी’ दिन

जागतिक ‘सीओपीडी’ दिन विशेष

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आज सीओपीडीच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की, अनेक जणांना आपल्याला सीओपीडीचा त्रास सुरू झाला आहे, हे लक्षात येत नाही. खोकला येणे, त्यातून पातळ कफ पडणे, धाप लागणे ही सीओपिंडीची प्रमुख कारणे आहेत. दीर्घकाळ राहणारा हा त्रास नंतर काहीजणांना सवयीचा बनतो.

सीओपीडी हा श्र्वसनाचा दीर्घकालीन चिवट विकार आहे. जिना चढताना, श्रम करताना, थोडे वेगात चालताना दम लागतो. सूक्ष्म श्वास वाहिन्या आणि वायुकोष यांच्या कामात बिघाड झाल्याने होणाऱ्या या आजारात फुप्फुसाची लवचिकता थोडक्यात स्थितिस्थापकत्व नाहीसे होऊ लागते. त्यामुळे रुग्णाला श्वसनात अडथळा निर्माण होतो. श्वास आत घेतल्यानंतर फुप्फुसे मूळ आकाराला येत नाहीत. त्यामुळे श्‍वास बाहेर सोडण्यास त्रास होतो. अशा रुग्णांची वेळीच पल्मोनरी फंक्शन टेस्ट म्हणजेच ‘पीएफटी’ चाचणी केली तर फुप्फुसाची क्षमता समजून येते आणि वेळीच उपचार सुरू केले तर सीओपिडी नियंत्रणात ठेवता येतो. यासाठी श्वसनाच्या कोणताही तक्रारीकडे दुर्लक्ष न करता वेळीच तज्ज्ञांचा सल्ला व उपचार घेणे हिताचे ठरते.

हेल्दी लंग्ज- नेव्हर मोर इम्पॉर्टंट ?

निरोगी फुप्फुसे हे ‘‘हेल्दी लंग्ज- नेव्हर मोर इम्पॉर्टंट’’ म्हणजेच निरोगी फुप्फुसे आजच्या इतकी महत्त्वाची कधीच वाटत नव्हती. त्याचे कारण वाढलेले प्रदूषण आणि बिघडलेली जीवन शैली. फुप्फुसे निरोगी ठेवणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी सकस आणि संतुलित आहार, नियमित व्यायाम, प्राणायाम, दीर्घश्वसन ताणतनाव मुक्त जीवन ही त्रिसूत्री महत्त्वाची आहेच. पण त्याबरोबर आपला परिसर आणि पर्यावरण प्रदूषण मुक्त असणे महत्त्वाचे आहे.

सिगारेट, विडी यासारखे व्यसन हे त्या व्यक्तीच्या सीओपीडीला आमंत्रण असतेच, पण सभोवतालच्या व्यक्तीनाही सीओपीडीचा धोका निर्माण होतो. धुळीत काम करणारे, रस्त्यावरील विक्रेते, वाहतूक पोलिस अशा प्रदूषणात आणि धुरात काम करणाऱ्या सर्व व्यक्ती सीओपीडी साठी संभाव्य रुग्ण असतात. या सर्वांनी आपली नियमित आरोग्य चाचणी करून घ्यावी हे यानिमित्ताने सांगणे.

कोरोना हद्दपार होत आला असता तरी आरोग्याचे प्रश्न संपलेले नाहीत. दिल्लीत प्रदूषणाचा भस्मासुर पसरला आहे. प्रदूषणामुळे तेथे लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. परिस्थिती गंभीर झाली आहे. हे सर्व आज सांगण्याचे कारण म्हणजे आज जागतिक ‘सीओपीडी दिन’ आहे. सीओपीडी म्हणजे ‘क्रॉनिक ऑबस्ट्रक्टिव पल्मोनरी डिसिज’. नोव्हेंबर महिन्यातील तिसऱ्या बुधवारी हा दिवस साजरा करतात. वायुप्रदूषण हे सीओपीडीचे प्रमुख कारण आहे.

- डॉ. अनिल मडके, छातीरोग तज्ज्ञ

loading image
go to top