तरुणांनो..जपा तुमचे मौल्यवान ह्रदय! युवा फिटनेस उद्योजक सांगतात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

heart

World Heart Day 2021 : तरुणांनो.. जपा तुमचे मौल्यवान ह्रदय!

जागतिक हृदय दिन (World Heart Day) हा दिवस दरवर्षी २९ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हृदयाची काळजी घेणे आणि आपले हृदय निरोगी ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेक जण त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. यात हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाणही दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे. वयाच्या २२-२३ वर्षाच्या तरुणांमध्येही समस्या जाणवत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे या समस्येकडे वेळीच लक्ष दिलं पाहिजे. या दिनानिमित्त विविध उपक्रमांच्या माध्यमातून हृदयविकाराचे प्रतिबंधात्मक उपाय आणि या विकाराचा जागतिक पातळीवर होणारा परिणाम या बद्दल चर्चा केली जाते. हृदयरोग टाळण्यासाठी, खाण्या-पिण्याची कशी विशेष काळजी घ्यावी. याबाबत युवा फिटनेस उद्योजक चिराग बडजात्या (Chirag Barjatya) यांच्याशी केलेली खास बातचीत...

हृदयविकाराची ही आहेत प्रमुख कारणे –

हृदयाला रक्तपुरवठा योग्य पद्धतीने न होणे

व्यायामाचा अभाव

पौष्टिक आहाराचा अभाव

धुम्रपान व मद्यपान करण्याची सवय

अयोग्य जीवनशैली

अतिताणतणाव

लठ्ठपणा

युवा फिटनेस उद्योजक चिराग बडजात्या यांच्याशी केलेली खास बातचीत...

तरुणांमध्ये प्रमाण वाढत चाललंय...

विशीमध्ये आणि तिशीमध्येही तरुणांना हृदयविकार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यासाठी त्यांची चुकीच्या पद्धतीची जीवनशैली कारणीभूत आहे. बैठी जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या सवयी, धूम्रपानामुळे तरुणांमध्ये हृदयविकार वाढता आहे.

मद्यपान करणे हृदयासाठी कितपत घातक आहे?

सध्याच्या युगात अल्कोहॉल हे फॅशन मानले जाते. परंतु धूम्रपान आणि दारू पिण्याच्या सवयीमुळे हृदयाला नुकसान पोहोचते. हे टाळण्यासाठी आपण जीवन हे नशामुक्त आणि औषधमुक्त असणे आवश्यक आहे.

नियमितपणे तपासणी गरजेची आहे का?

३० वर्षानंतर रक्तदाबाची नियमितपणे तपासणी केली पाहिजे. लठ्ठपणा असलेल्यांनी अशावेळी स्वत: ची काळजी घेणे आवश्यक आहे. हार्ट अटॅकशी संबंधित रुग्णांनाही सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

काय खावे, काय खाऊ नये?

हृदयरोग टाळण्यासाठी, खाण्या-पिण्याची विशेष काळजी घ्यावी. अधिक तळलेले अन्न, तूप, लोणी, मीठ, मिरपूड आणि मिठाळी खाण्याने शरीरात कॅलरीज, कोलेस्ट्रॉल आणि चरबी वाढते.

रक्ताभिसरण उत्तम राहण्यासाठी काय करावे?

तुम्ही जर हृदय विकाराचे रुग्ण असाल तर तुमच्यासाठी योगा करणे फायद्याचे ठरेल. आपण कमीत कमी अर्धा तास योग करू शकता. हे कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब, तणाव यासह अनेक समस्या काढून टाकते. तसेच, रक्ताभिसरण देखील चांगले राखण्यास मदत करते.

लक्षणे ओळखा

छातीत डाव्या किंवा उजव्या बाजूला दुखत असेल तर ही हृदयरोगाच्या प्रारंभाची लक्षणे असू शकतात. आखडल्यासारखे किंवा घशामध्ये कोंडल्यासारखे वाटणेही हृदयरोगाशी संबंधित आहे.

लहान मुलांना कितपत धोका?

मुलांना रक्तदाब किंवा मधुमेह होत नाही. पण कुटुंबात कोणाला जर हे आजार असतील तर बालपणीही हे आजार होऊ शकतात. लहान मुलांचे वजन, स्थूलपणाही नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे.

निश्चित वय नाही

हृदयरोग होण्यासाठी निश्चित वय नाही, तो कोणत्याही वयात येऊ शकतो. रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि मधुमेहाचीही तपासणी नियमित करावी.

'हे' टाळाल तर राहाल 'फिट'

साखर, मीठ व चरबीयुक्त पदार्थांचे जास्त सेवन

गरजेपेक्षा जास्त खाणे आणि जंक फूड

कोणत्याही गोष्टीचा ताण घेणे

तंबाखू आणि धूम्रपान, दारू पिणे

सर्वात आवडीचे पदार्थ कमी खा.

निरोगी हृदयासाठी 'हे' अवश्य करा

तुमचे वजन, रक्तदाब, रक्तशर्करा तपासून घ्या.

दररोज 30 मिनिटे व्यायाम करा

योगाद्वारे तणावाचे व्यवस्थापन करा.

हिरव्या भाज्या आणि फळे खा.

हृदयविकाराचा धोका हा वयोमानापरत्व वाढता असला तरीही त्याची लागण ही अनेक अनुवंशिक आणि पर्यावरणातील घटकांवरही अवलंबून असते. मात्र अलीकडे तरुणांना हृदयविकाराचा धोका वाढता असल्याचं निष्पन्न झालं आहे.

Web Title: World Heart Day 2021 Youth Fitness Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Youthyoungheart attack