World Pneumonia Day 2021: न्युमोनियापासून वाचण्यासाठी आहारात करा या 6 गोष्टींचा समावेश  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pneumonia
World Pneumonia Day 2021: न्युमोनियापासून वाचण्यासाठी आहारात करा या 6 गोष्टींचा समावेश 

World Pneumonia Day 2021: न्युमोनियापासून वाचण्यासाठी आहारात करा या 6 गोष्टींचा समावेश 

sakal_logo
By
टीम ई सकाळ

निमोनिया हा फुफ्फुसाचा संसर्ग आहे. यामुळे फुफ्फुसात पू तयार होतो. त्यामुळे सतत खोकला, ताप येतो. तसेच श्वास घेण्यास त्रास होतो. यासाठी न्यूमोनिया होणे हा प्रत्येक वयोगटासाठी चिंतेचा विषय आहे. तर, वृद्धांमध्ये न्यूमोनियाची पातळी वाढली तर ते धोकादायक आहे. म्हणूनच न्यूमोनिया टाळण्यासाठी काही घरगुती उपाय करणे गरजेचे आहे. यासाठी सकस आहार घेणे फायद्याचे ठरेल. सकस आहार घेतल्याने तुम्ही निरोगी तर राहताच, पण न्युमोनियापासून तुमचे संरक्षण करू शकतो. त्यामुळे आहारात अशा काही गोष्टींचा समावेश केला पाहिजे, की ज्यामुळे न्युमोनियाचा धोका कमी होण्यास मदत होईल.

vegetables

vegetables

हिरव्या भाज्या- हिरव्या भाज्या आरोग्यासाठी अतिशय फायद्याच्या आहेत. हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए, सी, फायबर, पोटॅशियम तसेच इतर अनेक आवश्यक जीवनसत्वे असतात. यामुळे न्यूमोनियापासून आपले संरक्षण होण्यास मदत मिळू शकते.

फळांचे ज्यूस- आरोग्यासाठी अतिशय चांगली म्हणून फळे खाणे महत्वाचे मानले जाते. न्यूमोनिया झाल्यास लहान मुले आणि मोठ्यांनी जास्तीत जास्त ताज्या फळांचा ज्यूस पिणे चांगले आहे. अशा ताज्या फळांचा ज्यूस प्यायल्यास न्युमोनिया टाळता येतो.

Egg

Egg

अंड- न्युमोनियाचा धोका हिवाळ्यात जास्त असतो. त्यामुळे तुमच्या आहारात अंड्याचा समावेश करू शकतो. अंडी गरम असतात. शिवाय त्यात पोषक तत्वे असतात. त्यामुळे अंडी खाल्ल्याने न्युमोनियावर नियंत्रण ठेवता येईल.

लसूण- लसूण न्युमोनियाचा संसर्ग टाळण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मॅंगनीज, मॅंगनीज, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, सेलेनियम, फायबर हे गुणधर्म लसणात आढळतात. यामुळे व्हायरल, फंगल इंफेक्शनपासून संरक्षण होते.

हळद- हळद आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. हळदीमध्ये असलेले अँटीव्हायरल व अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म न्यूमोनिया होण्यापासून संरक्षण होईल. तसेच हळदीचे दूध प्यायल्याने श्वासोच्छवासाचा त्रासही टाळता येतो.

loading image
go to top