esakal | योगासने आणि फायदे
sakal

बोलून बातमी शोधा

Yoga

योगासने केल्याने फक्त शरीरच तंदुरुस्त राहत नाही, तर त्यामुळे मनःशांती, तजेलदार त्वचा मिळते. तसेच वजनातही घट होते. योगासने करण्याला वयाची कोणतीही मर्यादा नसते. फक्त तुमच्या शरीरयष्टीनुसार व तुम्हाला असलेल्या व्याधींनुसार योगासने निवडावीत. लक्षात घ्या, योगासने दीर्घकाळ फायदे देतात.

योगासने आणि फायदे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

योगासने केल्याने फक्त शरीरच तंदुरुस्त राहत नाही, तर त्यामुळे मनःशांती, तजेलदार त्वचा मिळते. तसेच वजनातही घट होते. योगासने करण्याला वयाची कोणतीही मर्यादा नसते. फक्त तुमच्या शरीरयष्टीनुसार व तुम्हाला असलेल्या व्याधींनुसार योगासने निवडावीत. लक्षात घ्या, योगासने दीर्घकाळ फायदे देतात. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये योगासनाला जीवनाचा एक भाग करून घेणे गरजेचे आहे. यामुळे मन, शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

फक्त शारीरिक स्वास्थ्य असून चालणार नाही, तर मानसिक स्वास्थ्यही गरजेचे आहे. अशा वेळी योगासनेच तुम्हाला मदत करू शकतात. त्यासाठी आसने, प्राणायाम (श्‍वासोच्छ्वासाच्या लयी) आणि ध्यानधारणा या गोष्टी उत्तम आरोग्य राखायला उपयोगी पडतात.

सूर्यनमस्कार, कपालभाती आणि प्राणायाम या योगिक क्रियांनी वजन कमी होते. त्याचप्रमाणे रोज नियमित योगाचा सराव केल्याने आपल्या शरीराला कधी आणि कोणत्या अन्नाची गरज आहे याचा अंदाज आपल्याला येतो.

आपली यंत्रणा ही शरीर, मन आणि आत्मा या तिघांपासून बनलेली असते. त्यामुळे शारीरिक अस्वस्थपणाचे पडसाद जसे मनावर आघात करतात, तसेच मानसिक अस्वास्थ्याचे परिणाम शरीरात रोगाच्या रूपाने प्रकट होतात. योगासनांमुळे इतर अवयवांना व स्नायूंना बळकटी देण्यात येते. श्‍वसनाच्या वेगवेगळ्या तंत्रांमुळे आणि ध्यानधारणेमुळे शरीरात साठलेला ताण तणाव निघून जातो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.