Medicine Price: नागरिकांसाठी दिलासादायक बातमी! या औषधांच्या किमती होणार कमी

वैद्यकिय क्षेत्रातून नागरिकांना दिलासा देणारी बातमी आता पुढे येतेय. मंगळवारी तब्बल 127 औषधांच्या किंमती ठरवण्यात आल्या
Medicine Price
Medicine Priceesakal

Medicine Price: कोरोनाचा प्रादूर्भाव सगळीकडे वाढत चालल्याने आता लोकांची आरोग्याविषयीची दक्षता वाढली आहे. मात्र वैद्यकिय क्षेत्रातून नागरिकांना दिलासा देणारी बातमी आता पुढे येतेय. मंगळवारी तब्बल 127 औषधांच्या किंमती ठरवण्यात आल्याची माहिती नॅशनल फार्मास्यूटिकल प्रायसिंग अथॉरिटीकडून (National Pharmaceutical Pricing Authority (NPPA) देण्यात आली. यात तुमच्या रोजच्या वापरातील बऱ्याच औषधांचा समावेश आहे.

स्वस्त औषधे बाजारात कधी उपलब्ध होणार?

NPPA ने सलग या वर्षात पाचव्यांदा औषधांच्या किंमती कमी केल्या आहेत. लवकरच नव्या स्वस्त दरातील औषधे बाजार उपलब्ध होतील. अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे कमी किमतीतील औषधं ही 2023 मध्ये शेवटच्या आठवड्यापासून उपलब्ध होतील. तसेच सर्वसामान्य नागरिक ही औषधे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून विकत घेऊ शकतील.

कोणती औषधे झालीत स्वस्त?

  1. पॅरासिटामॉल - आधीची किंमत 2.3 रुपये होती आता ती 1.8 रुपयांमध्ये उपलब्ध असेल.

  2. अमोक्सिसिलिन आणि पोटॅशियम क्लेव्हुलेनेट - 22.3 रुपयांना विकले जाणारे अमोक्सिसिलिन आणि पोटॅशियम क्लेव्हुलेनेट 16.8 रुपये प्रति टॅबलेटमध्ये उपलब्ध असतील.

  3. मोक्सीफ्लॉक्सासिन (400mg) 31.5 रुपयांवरुन 22.8 रुपये प्रति टॅबलेटवर कमी करण्यात आले आहे.

Medicine Price
Medicine Price : कॅन्सरसह 'या' आजारांवरची औषधं 40 टक्क्यांनी स्वस्त; जाणून घ्या नव्या किमती

न्यूमोनिया सारख्या जिवाणू संसर्गावर उपचार करण्यासाठी औषधेही स्वस्त होणार आहेत. मात्र याचवेळी मधुमेहाच्या रूग्णांच्या काही औषधांच्या किंमतीत वाढ झाली आहे. नव्या किमतीची औषधे बाजारात येण्यासाठी साधारण एक महिना लागतो. पुढील महिन्याच्या अखेरीस नवा स्टॉक मिळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com