Breast Reduction Operation : स्तनाचा आकार कमी करण्यासाठी चक्क भारतात 15,000 महिलांनी केले ऑपरेशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Breast Reduction Operation

Breast Reduction Operation : स्तनाचा आकार कमी करण्यासाठी चक्क भारतात 15,000 महिलांनी केले ऑपरेशन

Breast Reduction Operation : हल्ली महिला आपल्या शरीरयष्टीविषयी विशेष लक्ष देताना दिसून येतात. भारतातही याची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. भारतीय महिलांना अनेक गंभीर शारीरिक आणि मानसिक समस्यांमुळे त्यांचे वाढलेले स्तन नको वाटायला लागले आहे आणि याचसाठी अनेक महिला आपले वाढलेले स्तन कमी करण्यासाठी शस्त्रक्रियासुद्धा करत आहे.

2021 मध्ये स्तनाचा आकार कमी करण्यासाठी चक्क भारतात 15,000 महिलांनी ब्रेस्ट रिडक्शन ऑपरेशन केले आहे. ( 15 000 women opted breast reduction operations in India in 2021 for comfortable size read story)

एक 31 वर्षीय कॉर्पोरेट वकील सांगते की तीने डिसेंबर 2022 मध्ये ब्रेस्ट रिडक्शन ऑपरेशन करुन तिची 15 वर्षांची इच्छा पूर्ण केली. ती म्हणते, " वाढत्या स्तनांमुळे माझ्या शरीराचा आकार खराब झाला आहे असं मला सतत वाटायचं. माझ्यातला आत्मविश्वास कमी झाला होता पण मी हे ऑपरेशन करण्याचा धाडसी निर्णय घेतला.

ही एकटी नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल की 2021 मध्ये भारतात चक्क 15,000 महिलांनी ब्रेस्ट रिडक्शन ऑपरेशन केले आहे. या महिलांनी त्यांच्या ब्रेस्टमधून fat आणि glandular tissue काढून टाकण्याचा निर्णय घेतला. या तुलनेत स्तन प्रत्यारोपण करणाऱ्यांची संख्या दुप्पट आहे. जवळपास 31,608 स्त्रियांनी स्तन प्रत्यारोपण केले.

याशिवाय 11,520 महिलांनी 'ब्रेस्ट लिफ्ट'चे ऑप्शन निवडला. हि एक प्रकारची दुसरी प्लास्टिक सर्जरी आहे जी ब्रेस्टला कमी करण्याऐवजी लोंबते स्तनाला कमी करते ज्यामुळे स्तन छोटे दिसतात.

जुहूच्या नानावटी हॉस्पिटलचे प्लास्टिक सर्जन डॉ देवयानी बर्वे म्हणाल्या की गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांनी ब्रेस्ट लिफ्ट आणि रिडक्शन सर्जरी दुप्पट संख्येने केली आहे.

हिंदूजा हॉस्पिटलचे सर्जन अनिल टिब्रेवाला यांना गेल्या तीन वर्षांत स्तन कमी करण्याच्या शस्त्रक्रिया आणि ब्रेस्ट लिफ्टच्या मागणीत वाढ प्रकर्षणाने दिसून आली.

त्यांनी दोन फॅक्टर प्रामुख्याने सांगितले की भारतात स्तनाचा आकार हा फान्सपेक्षा मोठा आहे आणि दुसरं म्हणजे आजची तरुणाई शारिरीक अस्वस्थतेमुळे स्तनाचा आकार कमी करण्याचा लवकरात लवकर निर्णय घेतात आणि त्यांच्या या निर्णयाला त्यांचे आईवडिलही सपोर्ट करतात.