High BP Home Remedies : गोळ्या इंजेक्शन घेऊन नाही तर या 4 उपायांनी नॅचरली घालवा हाय BPचा त्रास l 4 home remedies to control High blood pressure naturally know homemade upay symptoms and care | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Home Remedies For High BP

High BP Home Remedies : गोळ्या इंजेक्शन घेऊन नाही तर या 4 उपायांनी नॅचरली घालवा हाय BPचा त्रास

Home Remedies For High BP : हल्ली लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्यकेच वयोगटाच्या लोकांना बीपीच्या समस्या दिसून येताय. त्यातच आता उन्हाळ्याला सुरुवात झाला असून कडक उन्हामुळे बऱ्याच लोकांना घाबरल्यासारखं होतं. ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे त्यांनी ते कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी हे काही घरघुती उपाय आवर्जून करायला हवेत.

तुमचं नॉर्मल ब्लड प्रेशर रीडिंग हे 120/80 mm Hg च्या कमी असायला हवं. हाय ब्लड प्रेशरचा त्रास तेव्हा उद्भवतो जेव्हा तुमच्या धमण्या आकुंचन पावतात. त्यामुळे शरीराला सुरळीत रक्तपुरवठा होत नाही. तेव्हा हाय ब्लड प्रेशरची लक्षणे वेळीच लक्षात येणंसुद्धा तेवढंच महत्वाचं ठरतं.

हाय ब्लड प्रेशरची लक्षणे

  • धुसर दिसणे किंवा दुहेरी दृष्टी

  • बेशुद्ध पडणे

  • थकवा जाणवणे

  • दीर्घकाळ डोकेदुखी

  • हृदयाचे ठोके वाढणे

  • अकारण नाकातून रक्त वाहणे

  • श्वास घेण्यास त्रास होणे

  • उलट्या होणे

हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात आणण्यासाठी करा हे उपाय

1) डॅश डाएट (DASH DIET)

ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यात तुमचा आहारसुद्धा महत्वाची भूमिका निभावते. तज्ज्ञांच्या मते, डॅश डाएट (डायटरी अप्रोच टू स्टॉप हायपरटेंशन) डाएट तुमच्या सिस्टोलिक ब्लड प्रेशरला कमी करते. या डाएटमध्ये मुख्यत:सीजनेबल फ्रुट्स, मेवा, मासे आणि कमी फॅटयुक्त डेअरी प्रोडक्टचा समावेश आहे.

2) मीठाचा कमी वापर

हाय बीपीचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी कायम मीठाच्या प्रमाणाबाबत काळजी घ्यावी. सोडियमचे प्रमाण वाढल्यास तुमचे ब्लड प्रेशरसुद्धा वाढते. तुमच्या जेवणाची चव वाढवण्यासाठी जेवणात आयुर्वेदिक मसाले आणि जडीबूटी यांचा समावेश असावा.

3) वजन नियंत्रणात ठेवणे

हाय ब्लड प्रेशरच्या समस्येमागे लठ्ठपणा हे एक महत्वाचं कारण असू शकतं. तज्ज्ञांच्या मते, अतिरिक्त फॅट्स तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठीसुद्धा बरे नाही.ही समस्या दीर्घकाळ राहील्यास तुम्हाला हृदयासंबंधित आणखी काही आजारही उद्भवू शकतात.

4) धुम्रपान लगेच थांबवा

तुम्हाला तुमचं ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवायचं असेल तर धुम्रपान सोडा. स्टडीनुसार, जे लोक हाय ब्लड प्रेशरने त्रस्त असून धुम्रपान करतात त्यांना हार्टअटॅक येण्याचा धोका वाढतो.