
natural ingredients for glowing skin in summer: उन्हाच्या तीव्र झळा सुरू झाल्या आहेत. यामुळे उन्हाळ्यात वारंवार अंघोळ करावी वाटते. उन्हाळ्यात जेव्हा जेव्हा तुम्हाला उन्हात राहावे लागते तेव्हा त्यानंतर थंड पाण्याने आंघोळ केल्याने सनबर्नचा धोका कमी होतो. तसेच घामामुळे पसरणारे बॅक्टेरिया आणि शरीराच्या वासामुळे होणारे बॅक्टेरिया कमी करण्यासाठी देखील थंड पाण्याने आंघोळ करण्याचा तज्ज्ञ सल्ला देखील देतात. उन्हाळ्यात अंघोळ करताना पाण्यात पुढील गोष्टी मिसळ्यास त्वचेसंबंधित समस्या कमी होतात.