
Sakal
अंडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी काही पदार्थांसोबत त्याचे सेवन टाळावे. सोया दूध, चहा, साखर, केळी आणि मांस यांसोबत अंडी खाल्ल्याने पचनसंस्थेवर विपरित परिणाम होऊ शकतो. या पदार्थांसोबत अंडी खाल्ल्याने प्रथिनांचे शोषण कमी होते आणि पचन समस्यांना कारणीभूत ठरू शकते.
अंडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. अंड्यामध्ये प्रथिने, जीवनसत्वे यासारखे अनेक पोषक घटक असतात. अंडी नियमितपणे खाल्यास वजन वाढणे, स्नायू मजबुत होणे, मेंदुचे कार्य सक्रिय राहणे, डोळ्यांचे निरोगी आरोग्य राखण्यास मदत होते. अंडी विविध प्रकारे सेवन करता येते. पण अंडी पुढील काही पदार्थांसोबत खाणे टाळावे. कारण त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो.