
Monsoon Spices: पावसाळा जितका आनंद देणारा असतो तेवढाच तो आरोग्यासाठी धोकादायक असतो. कारण या दिवसांमध्ये संसर्गाचा धोका वाढतो. ज्यामुळे लोक आजारी पडतात. तसेच या बदलत्या वातावरणात लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. या काळात सर्दी, खोकला, घसा खवखवणे आणि ताप यासारख्या समस्या सामान्य आहेत. अशावेळी शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि रोगांपासून दूर राहण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्हालाही तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल, तर स्वयंपाकघरात ठेवलेले काही मसाले तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. हे मसाले कोणते आहेत हे जाणून घेऊया.