lifestyle choices : जगण्याच्या पद्धती बदला अन् स्मृतिभ्रंशाचा धोका टाळा, हॅप्पी लाइफ जगा

दशकभऱ्यात चाललेल्या शोधानंतर गेल्या आठवड्यात यश मिळालं आणि स्मृतिभ्रंशाची स्थिती कंट्रोल करण्यासाठीच सहा महिन्यात आणखी दुसऱ्या औषधाचा शोध लागला
lifestyle choices
lifestyle choicesesakal

lifestyle choices : गेल्या दशकापासून अल्झायमर रोगावर मात करण्यासाठी सातत्याने शोध सुरु आहे. या आजाराचा कॉमन प्रकार म्हणजे स्मृतिभ्रंश. मात्र दशकभऱ्यात चाललेल्या शोधानंतर गेल्या आठवड्यात यश मिळालं आणि स्मृतिभ्रंशाची स्थिती कंट्रोल करण्यासाठीच सहा महिन्यात आणखी दुसऱ्या औषधाचा शोध लागला.

'डोनानेमॅब' असे या औषधाचे नाव आहे. या औषधाला प्रिस्क्रिप्शनवर उपलब्ध करून देण्याआधी अनेक अडथळे आलेत. मात्र ते दूर करून आता इतर औषधांप्रमाणेच हे औषध सुद्धा अल्झायमरवर मात करू शकेल अशी आशा शास्त्रज्ञांना आहे.

ही अल्झायमरच्या समाप्तीची सुरुवात ठरू शकते

डॉ. रिचर्ड ओकले म्हणाले, "अल्झायमरची कोणतीही नवीन औषधे नसताना २० वर्षांनंतर, आमच्याकडे आता फक्त बारा महिन्यांत दोन संभाव्य नवीन औषधे आहेत आणि प्रथमच, ही अशी औषधे निर्माण करण्यात आली आहे ज्यातून रोगप्रतिकारशक्ती वाढत आजाराचा प्रभाव कमी करता येईल. ही सुरुवात चांगली असून ती अल्झायमरच्या समाप्तीची ठरू शकते.

lifestyle choices
Dementia Disease : झोपेत लाथ मारण्याची किंवा ओरडण्याची सवय आहे धोक्याची घंटा

निश्चितच अल्झायमरच्या रोगावर उपचारासंबंधी ही अतिशय चांगली बातमी आहे. मात्र उपचारापेक्षा बचाव हा कधीही चांगला. संशोधनातून असे स्पष्ट झाले आहे की जीवनशैलीत काही बदल केले तर स्मृतिभ्रशाचा धोका कमी होऊ शकतो.

एका दशकापासून अधिक काळ केलेल्या तब्बल ३०००० प्रौढांवरील अभ्यासानंतर जीवनशैलीचे हे सहा उत्तम पर्याय तज्ज्ञांनी सूचित केले आहेत. जे स्मृतिभ्रंश होण्याचा धोका लक्षणीयरित्या कमी करू शकतात.

बीजिंग, चीनमधील नॅशनल सेंटर फॉर न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरमधील (Disease) शिक्षणतज्ञांनी 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रौढ व्यक्तींना 10 वर्षे सामान्य जगण्याबरोबर या टिप्स फॉलो करायला सांगितले. या टिप्स जीवनशैलीतील काही बदलांवर आधारित होत्या. ज्यामुळे स्मृती कमी होण्याचा दर कमी होतो.

lifestyle choices
Lifestyle Blog : मुलाच्या घरात राहायला नको वाटते....!

योग्या आहाराचा समावेश

फळे, भाज्या, शेंगा आणि शेंगदाणे यांसारख्या पदार्थांचा समावेश आहारात असावा. (Lifestyle)

चांगल्या सवयी

पत्ते खेळणे, शब्दकोडे करणे किंवा आठवड्यातून किमान दोनदा वाचन करणे ही दुसरी सर्वात प्रभावशाली वागणूक होती. दर आठवड्याला नियमित व्यायाम, १५० मिनिटांचा मध्यम तीव्रतेचा व्यायाम या सवयींचा समावेश असावा. तसेच अभ्यासात असे देखील असे आढळून आले की या वृद्ध लोकांनी या कालावधीत मद्यपान किंवा धुम्रपाम केलेले नव्हते. विशेष म्हणजे ज्यांना अनुवांशिकदृष्ट्या स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका होता त्यांच्यावर जीवनशैलीतील हे बदल प्रभावीरित्या काम करत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com