

7 Body Warning Signs of Slow Metabolism You Should Never Ignore
sakal
Signs of Slow Metabolism: आजकाल वजन वाढणं, सतत थकवा जाणवणं किंवा दिवसभर सुस्ती वाटणं याकडे आपण “रूटीनचा भाग” म्हणून पाहतो. पण शरीर अशा वेळी गप्प बसत नाही. ते अगदी लहान लहान संकेत देत असतं. हे संकेत वेळेत ओळखले नाहीत, तर पुढे जाऊन डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉल किंवा फॅटी लिव्हरसारखे आजार होण्याची शक्यता होऊ शकते. शरीराच्या आत चालणारी एक महत्त्वाची प्रक्रिया मंदावली की हे सगळं घडू लागतं. या प्रकियेला मेटाबॉलिज्म असं म्हणताता. त्यामुळेच या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष न करता त्यांचा अर्थ समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे.