New Variant of Corona : राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ; आतापर्यंत ९१ जणांमध्ये ‘केपी.२’चे निदान

राज्यात कोरोनाचा नवीन उपप्रकार आढळला आहे. केपी. २ (फ्लर्ट) असे या उपप्रकाराचे नाव आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत ९० कोरोना रुग्णांमध्ये या नवीन उपप्रकाराचे निदान झाले आहे.
New Variant of Corona
New Variant of Coronasakal

पुणे : राज्यात कोरोनाचा नवीन उपप्रकार आढळला आहे. केपी. २ (फ्लर्ट) असे या उपप्रकाराचे नाव आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत ९० कोरोना रुग्णांमध्ये या नवीन उपप्रकाराचे निदान झाले आहे. त्यामुळे जे रुग्ण आधीच इतर आजारांनी ग्रस्त आहेत, त्यांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

कोविडच्या ओमिक्रॉन प्रकाराचा जे.एन. १ उपप्रकार आता केपी.२

मध्ये बदलला आहे. याला फ्लर्ट प्रकारदेखील म्हटले जाते. जे.एन. १ व्हेरिएंटनंतर, केपी. २चा अमेरिकेत अधिक प्रभाव दिसून आला. राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील ९१ जणांमध्ये नवीन उपप्रकाराचे निदान झाले असून त्यात पुण्यातील ५१, ठाणे २०, अमरावती ७, छत्रपती संभाजीनगर ७, सोलापूर, अहमदनगरमधील २ रुग्णांचा समावेश आहे.

झाले असून त्यात पुण्यातील ५१, ठाणे २०, अमरावती ७, छत्रपती संभाजीनगर ७, सोलापूर, अहमदनगरमधील २ रुग्णांचा समावेश आहे. लातूर, नाशिक आणि सांगलीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. नवीन सब-व्हेरिएंटचा एकही रुग्ण मुंबईत आढळलेला नाही. शुक्रवारी (ता.१०) राज्यात ८ नवीन कोविड रुग्ण आढळून आले. त्यात मुंबईतील ४, ठाणे, पनवेल, सांगली व छत्रपती संभाजीनगरमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश होता

New Variant of Corona
Corona Compensation: कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या पत्नीला हायकोर्टाने नाकारली 50 लाखांची भरपाई, दिले 'हे' कारण

कोरोनाच्या जे. एन.१ प्रकारातील उत्परिवर्तनानंतर केपी. २ उपप्रकार तयार झाला आहे. कोविड विषाणूशी लढण्यासाठी आपले शरीर जसजसे मजबूत होत आहे, तसतसे विषाणूदेखील उत्परिवर्तन करत आहे आणि त्याचे अस्तित्व वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. हा ओमिक्रॉनचा उप-प्रकार आहे, त्याचा प्रसार झपाट्याने होतो. जे लोक आधीच मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर आजारांनी ग्रस्त आहेत. त्यांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

- प्रा. डॉ. राजेश कार्यकर्ते, सदस्य, महाराष्ट्र टास्क फोर्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com