Kairi Panha Recipe: उन्हाळ्यात कोल्डड्रिंक ऐवजी प्या कैरीचं पन्हं, आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

Kairi Panha Benefits: कैरी पन्हं हे चवीला तर उत्तम असतंच शिवाय त्याचे आरोग्यासाठी देखील अनेक फायदे आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात कार्बोनेटेड शीत पेय पिण्यापेक्षा कैरी पन्ह पिणे हा केव्हाही उत्तम पर्याय ठरेल.
Kairi Panha Recipe
Kairi Panha RecipeEsakal

Kairi Panha Recipe: उन्हाळा सुरू झाला की सगळेजण वळतात ते म्हणजे सुती कपडे आणि थंडगार पेयांकडे. उन्हाळ्याच्या दिवसात आपण आहारातही हलका आहार घेण्यास प्राधान्य देतो.

त्यात उन्हाचा तडाखा वाढला की आपोआप हात वळतात ते कोल्डिंगच्या बाटल्यांकडे. थंडगार कोल्ड ड्रिंक्स किंवा सॉफ्ट ड्रिंक्स Soft Drinks प्यायल्याने तात्पुरता दिलासा मिळत असला तरी ही पेयं आरोग्यासाठी हानिकारक आहेत.

सॉफ्ट ड्रिंक्स जास्त प्रमाणात प्यायल्याने टाईप-2 मधुमेह, वजन वाढणे अशा आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. या पेयांमुळे पचनशक्ती बिघडते. त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यात सॉफ्ट ड्रिंकएवजी कैरी पन्हे Raw Mango Drink पिऊन अधिक समाधान मिळवू शकता. Aam Panna Benefits in Summer Avoid Soft Drinks

कैरी पन्हं हे चवीला तर उत्तम असतंच शिवाय त्याचे आरोग्यासाठी देखील अनेक फायदे आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात कार्बोनेटेड शीत पेय पिण्यापेक्षा कैरी पन्हं पिणे हा केव्हाही उत्तम पर्याय ठरेल. 

असं बनवा कैरी पन्हे kairi panhe recipe

साहित्य: ४-५ आंबट कैरी, एक वाटी गूळ, वेलची पूड, सैंधव मीठ

कृती (Kairi Panha Recipe)-

कैऱ्या स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यावी. या कैऱ्या कुकुरमध्ये २ शिट्ट्या घेऊन शिजवून घ्याव्या. त्यानंतर कैऱ्या गार झाल्यानंतर त्यातील कोय काढून गर काढून घ्यावा. त्यानंतर कैरीचा गर, गूळ, वेलची पूड आणि सैधव मीठ हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये चांगल बारिक करून घ्याव. तयार झालेलं मिश्रण चांगलं गाळून घ्यावं. पन्ह्याचं मिश्रण अशाप्रकारे तयार होईल. 

पन्ह्याचं तयार मिश्रण तुम्ही हवाबंद बाटलीत भरून फ्रिजमध्ये एक महिनाभर ठेवू शकता. ज्यावेळी पन्हे प्यायचे असेल त्यावेळी एका ग्लासामध्ये पाव ग्लास भरून तयार मिश्रण घ्या आणि थंडगार पाणी आणि आवडीनुसार बर्फ घेऊन मिश्रण चांगलं मिसळून घ्याव. अशा प्रकारे तुम्ही थंडगार पन्ह्याचा आनंद घेऊ शकता. 

कैरी पन्हे बनवताना गुळा एवजी सारखही वापरू शकता. मात्र गूळ हे अधिक आरोग्यदायी असल्याने गूळाचा वापर करणं फायदेशीर ठरेल. मिश्रण तयार करताना जितका कैरीचा गर तितकाच गूळ घ्यावा. 

घरच्या घरी अगजी कमी पैशात तयार होणारे कैरी पन्हे हा कोल्ड ड्रिकंपेक्षा नक्कीच गुणकारी पर्याय आहे. तेव्हा उन्हाळ्यात गरमीसाठी कैरी पन्हे एकदा तरी बनवून पाहाच. Healthy Raw Mango Juice 

हे देखिल वाचा-

Kairi Panha Recipe
Summer Health : उन्हाळ्यात केलेल्या या चुका पडतील महागात; वेळीच सावध व्हा !

उन्हाळा सुरू झाला की बाजारात मोठ्या प्रमाणात कच्चे आंबे म्हणजे कैऱ्या उपलब्ध असतात. त्यांची किंमतही खिश्याला परवडण्यासारखी असते. या कैऱ्यांपासून तुम्ही घरच्या घरी पन्हं बनवू शकता. घरगुती कैरी पन्हे पिऊन तुम्हाला आरोग्यदायी फायदेही होतील. काय आहेत कैरी पन्ह्याचे फायदे हे जाणून घेऊयात. Raw Manogo benifits

१. रोगप्रतिकारक शक्ती वाढते- कैरी पन्ह्यामध्ये विटामिन-सीचं प्रमाण अधिक असतं त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. परिणामी तुमचं शरिर कोणत्याही आजाराशी समना करण्यासाठी सक्षम बनतं.

२. पचनक्रिया सुधारते- कैरी पन्ह प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. उन्हाळ्यात पचनासंबधीच्या अनेक समस्या उद्भवतात. यामुळे फॅबरयुक्त कैरी पन्ह पिणं गुणकारी ठरू शकतं. पचनक्रिया सुधारल्याने बद्धकोष्ठता, गॅस, मळमळ आणि पोट फुगणे अशा समस्या दूर होण्यास मदत होते.

३. त्वचा आणि केसांसाठी गुणकारी- कैरीमध्ये विटामिन-सी सोबतच मोठ्या प्रमाणात अँटीऑस्किडंट उपलब्ध असतात. यामुळे त्वचा आणि केस निरोगी राहण्यास मदत होते. त्वचेवर कमी सुरुकुत्या येतात. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला त्वचेच्या समस्यांपासून दिलासा हवा असेल तर कैरीचं पन्ह नक्की प्या. 

४. यकृतासाठी गुणकारी- उष्णाळ्यात यकृतासंबधी समस्या निर्माण होवू शकतात. कैरी पन्हे प्यायल्याने यकृत डिटॉक्स होण्यास मदत होते. 

५. ओरल हेल्द सुधारते- कैरी पन्ह्यामध्ये असलेल्या विटामिन-सी मुळे ओरल हेल्द म्हणजेच तोंड्याच्या समस्याही दूर होता. तोंडातून दुर्गंधी येणे, हिरड्या दुखणे तसंच अल्सरपासून दिलासा मिळतो. 

६. डोळे निरोगी राहण्यास मदत- कैरीत विटामिन-सी, विटामिन-ए तसचं विटामिन बी-6 मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे डोळे निरोगी राहण्यास मदत होते. डोळे निरोगी होवून ती सुधारते. 

७. मधुमेहींसाठी गुणकारी- सॉफ्ट ड्रिंकमध्ये मोठ्या प्रमाणात साखरेचं प्रमाण असतं. त्याएवजी पन्ह्यामध्ये नैसर्गिक साखरेचं प्रमाण असतं. यामुळे इन्शुलिनची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसचं यात आढळणाऱ्या ग्लाईसेमिक इंडेक्समुळे रक्तातील सारखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.

आरोग्यदायिक कैरी पन्हे घरच्या घरी बनवणं अगदी सोप आहे. हा कमी खर्चिक आणि सोपा पर्याय आहे. कैरी पन्ह कसं बनवावं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल त्याची सोपी रेसिपी देखील आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com