

How Aamir Khan Beat Migraines and Lost 18 Kg with an Anti-Inflammatory Diet
sakal
Aamir Khan’s Migraine Diet Led to 18 Kg Weight Loss: बॉलिवूडमध्ये ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा आमिर खान नेहमीच आपल्या वेगळ्या कामाच्या शैलीमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असो. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. मात्र यावेळी कारण कोणतीही चित्रपटातील भूमिका नसून त्याचा आरोग्याशी संबंधित मोठा बदल आहे. आगामी 'हॅपी पटेल: खतरनाक जासूस' या कॉमेडी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आमिर अधिक बऱ्यापैकी बारीक आणि ताजातवाना दिसत आहे. त्याने तब्बल १८ किलो वजन कमी केल्याचं उघड केलं आहे.
दंगल आणि गजनीसारख्या चित्रपटांसाठी शरीरात मोठे बदल करणाऱ्या आमिर खानने यावेळी मात्र स्पष्ट केलंय की हा बदल चित्रपटासाठी नाही, तर त्याच्या वैयक्तिक आरोग्याच्या एका समस्येसाठी होता.