
थोडक्यात:
बदललेली झोपेची वेळ आणि उशिरा उठणे यामुळे आरोग्याच्या समस्या वाढत आहेत.
नैसर्गिक झोपण्याचा-उठण्याचा वेळ बिघडल्याने शरीराची कार्यक्षमता कमी होते.
उशिरा जागरणाच्या सवयी, विशेषतः ओटीटी बिंज वॉचिंग, झोपेचं चक्र विस्कळीत करत आहेत.
Benefits of Waking Up Early in The Morning: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत लोक उशिरापर्यंत जागे राहतात आणि सकाळी उशीरा उठतात, त्यामुळे आरोग्यविषयक समस्यांमध्ये वाढ होत आहे. तज्ज्ञांच्या मते, झोपण्याचा आणि उठण्याचा नैसर्गिक वेळ बिघडल्याने शरीराच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. म्हणून, नियमित आणि योग्य झोपेची वेळ ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
कामाच्या बदलत्या वेळा, रात्री उशिरापर्यंत ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर बिंज वॉचिंग करणे, यामुळे झोपेचं चक्र विस्कलित झालं आहे. ते वेळीच बदलणे गरजेचे आहे असे तज्ज्ञ सांगतात.