
Nagpur Health
sakal
नागपूर : पूर्व विदर्भात हैदोस घालणाऱ्या चंडिपुरा मेंदूज्वराने दीड दशकापूर्वी उच्चाटन झाले. पण आता उपराजधानीत अल्पावधीत मेंदूज्वराचे (अॅक्युट एन्सेफॅलायटीस सिंड्रोम) २० रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. तत्काळ राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेचे पथक मंगळवारी (ता.२३) नागपुरात धडकले.