

Sakal
मुंबईतील 37 वर्षीय उज्ज्वला चव्हाण यांनी अलीकडेच सर्वात पहिले सॉलिड फूड सेवन केले. इतरांसाठी रोजची बाब असली तरी, त्या यासाठी त्या तब्बल 14 वर्षांपासून प्रतीक्षा करत होत्या. लग्नानंतर लगेच तिचा घसा आणि अन्ननलिकेच्या भागातील जंक्शन अरुंद झाल्यामुळे (स्ट्रिक्चर) अन्ननलिकेत घन अन्न जाऊ शकत नव्हते आणि यावर्षी सप्टेंबरमध्ये त्यांना कॅन्सरचे निदान झाले .
अखेर एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर येथे त्यांच्यावर रोबोटिक इसोफॅजेक्टॉमी ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया करण्यात आली आणि यशस्वी उपचारांनंतर त्यांनी पुन्हा घन आहार सेवन करण्यास सुरुवात केली.