Women Bone Health : तिशीनंतर महिलांची हाडे का कमकुवत होतात? महिलांनी अशी राखावी हाडांची निगा

महिलांनी हाडांची निगा कशी राखायची जाणून घ्या
Women Bone Health
Women Bone Healthesakal

Women Bone Health : तुमच्या आहारात पुरेसं पोषण नसेल तर त्याचा परिणाम शरीरावर होतो. तरुण पिढीला जंक फूड खायला फार आवडतं. याशिवाय तळलेल्या पदार्थांनाही त्यांची जास्त पसंती असते. मात्र या सवयींचा प्रभाव तिशीनंतर दिसायला सुरुवात होते. जंक फूड किंवा तेलकट तूपकट पदार्थांमधून शरीराला पुरेसं पोषण मिळत नाही. याचा परिणाम लगेच दिसत नसला तरी भविष्यात महिलांच्या आरोग्यावर याचे गंभीर परिणाम होतात.

कॅल्शियमयुक्त जेवण न जेवणे हे भविष्यातील हाडांच्या समस्येचं मुख्य कारण ठरू शकतं. कॅल्शियमयुक्त जेवण न केल्याने बोन डेंसिटी कमी होते. तिशी उलटलेल्या महिलांमध्ये हॉर्मोनल चेंजेसमुळेही हाडांच्या समस्या उद्भवू शकतात.

तिशीनंतर महिलांमध्ये या कारणांनी बोन डेंसिटी कमी होते

पोषक तत्वांची कमतरता

कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि इतर आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असलेल्या आहाराचे सेवन केल्याने हाडांची घनता कमी होण्याचा धोका वाढू शकतो. कॅल्शियम हाडांसाठी आवश्यक जीवनसत्व मानले जाते.

हार्मोनल चेंजेस

मेनोपॉजनंतर, स्त्रियांना इस्ट्रोजेनच्या पातळीत लक्षणीय घट जाणवते. इस्ट्रोजेन हाडांची घनता राखण्यासाठी आवश्यक आहे आणि जेव्हा पातळी कमी होते, तेव्हा हाडांची झीज वाढते. याव्यतिरिक्त, पॅराथायरॉइड हार्मोन (PTH) आणि थायरॉईड हार्मोन यांसारखे इतर हार्मोन हाडांच्या चयापचयात महत्त्वाची भूमिका बजावतात आणि या हार्मोन्समधील असंतुलन हाडांची झीज होण्यास कारणीभूत ठरू शकते.

अनुवांशिक कारण

हाडांच्या समस्यांचा संबंध अनुवांशिकतेशीही आहे. त्यामुळे कंटुंबात हा त्रास आधिच असल्यास तुम्हालाही तो होण्याची धोका जास्त असतो. जर कुटुंबातील सदस्याला ऑस्टियोपोरोसिस आणि हाडांच्या घनतेची समस्या असेल तर ही समस्या अनुवांशिकरित्या पुढे उद्भवू शकते.

औषधांमुळे

हायपरथायरॉईडीझम सारख्या काही आजारांसाठी औषधांचा वापर केल्याने देखील हाडांची घनता कमी होऊ शकते. जर तुम्ही अशी औषधे घेत असाल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Women Bone Health
Bone Strengthening Foods : हाडांच्या योग्य पोषणासाठी योग्य कॅल्शियम कोणतं?

तिशीनंतर हाडांची निगा कशी राखावी?

संतुलित आहार घ्या

कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि इतर पोषक तत्वांनी युक्त आहार घेऊन तुम्ही हाडांची घनता सुधारू शकता. दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या आणि कडधान्यांचा आहारात समावेश करून तुम्ही हाडांचे आरोग्य सुधारू शकता. (Bone Health)

नियमित व्यायाम करा

हाडांची घनता सुधारण्यासाठी तुम्ही जीवनशैलीत व्यायामाचा समावेश करू शकता. यामध्ये वेट लिफ्टिंग, जॉगिंग आणि चालण्याचा तुमच्या दिनक्रमात समावेश करा.

Women Bone Health
Bone Health: कोवळ्या उन्हात तासभर थांबा, होईल मोठा लाभ; हाडांची ठिसूळता रोखण्यासाठी लक्षात ठेवा त्रिसूत्री

मद्यपान आणि धूम्रपान करू नका

धुम्रपान तुमच्या हाडांसाठी हानिकारक आहे. धूम्रपान न केल्याने, तुम्ही कमी हाडांच्या घनतेची समस्या कमी करू शकता. यासोबतच तुम्ही अल्कोहोलचे सेवनही कमी केले पाहिजे.

नियमित तपासणी करा

कमी हाडांची घनता वेळीच ओळखून तुम्ही ही समस्या टाळू शकता. यासाठी नियमितपणे तपासणी करत रहा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com