Anemia : वयाच्या चाळीशीनंतर महिला का होतात अ‍ॅनिमियाची शिकार?, जाणून घ्या कारणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anemia : वयाच्या चाळीशीनंतर महिला का होतात अ‍ॅनिमियाची शिकार?, जाणून घ्या कारणे

Anemia : वयाच्या चाळीशीनंतर महिला का होतात अ‍ॅनिमियाची शिकार?, जाणून घ्या कारणे

स्त्रियांमध्ये अशक्तपणा ही एक सामान्य समस्या आहे. वाढत्या वयानुसार महिलांना आरोग्यविषयक संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यातीलच एक समस्या म्हणजे अॅनिमियाची होय. या आजारादरम्यान, पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अशक्तपणाची समस्या अधिक प्रभावित करते. स्त्रियांना योग्य आहार न मिळणे, मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्त्राव होणे, गर्भधारणेदरम्यान वाढणाऱ्या गर्भासाठी लोह अधिक लागणे, स्तनपान यांसारखी कारणे कारणीभूत ठरू शकतात.

अशक्तपणा म्हणजे काय?

अॅनिमिया ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये तुमच्या शरीरात पुरेशा लाल रक्तपेशी नसतात. लाल रक्तपेशींच्या कमतरतेमुळे, शरीरात ऑक्सिजनची कमतरताही भासू शकते. ज्यामुळे नवीन रक्त शरीरात योग्यरित्या तयार होऊ शकत नाही. लाल रक्तपेशींमधील हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्यामुळे अॅनिमिया होतो. ग्लोबल न्यूट्रिशनच्या अहवालानुसार, भारतातील सर्व वयोगटातील ५१ टक्के महिलांना गर्भधारणेदरम्यान अॅनिमियाचा त्रास होतो.

हेही वाचा: Recipe : मसालेदार छोले मटर कुलचे; घरीच बनवण्यासाठी सोपी रेसिपी

हिमोग्लोबिन किती प्रमाणात असावे?

डॉक्टरांच्या मते, पुरुषांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण किमान 15 ग्रॅम आणि महिलांमध्ये 13.6 ग्रॅम प्रति 100 ग्रॅम मि.ली. इतके असावे.

अशक्तपणासाठी जबाबदार कारणे कोणती?

स्त्रियांमध्ये रक्तक्षय होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांची मासिक पाळी आणि गर्भधारणा होय. याशिवाय लोहाची कमतरता, अनुवांशिक घटक, रजोनिवृत्ती आणि हार्मोनल बदल हेही घटक अशक्तपणासाठी कारणीभूत ठरु शकतात.

अशक्तपणाची लक्षणे

 • चक्कर येणे

 • अवास्तव थकवा जाणवणे

 • त्वचा पिवळी पडणे

 • तळवे आणि तळवे थंड राहतात

 • डोळ्यांखाली काळी वर्तुळे

 • शरीराचे तापमान कमी

 • छाती दुखणे

 • नेहमी डोके दुखणे

हेही वाचा: Hair Care Tips : केसांच्या वाढीसाठी तयार करा गाजराचे तेल..

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी कोणते उपाय करावे?

 • 10 ते 12 मनुके रात्रभर भिजवून, सकाळी त्याचे पाणी प्यावे आणि मनुके खाल्ल्याने हिमोग्लोबिन झपाट्याने वाढते.

 • मेथी, पालक, मोहरी, हरभरा अशा हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा. याशिवाय लौकी, ब्रोकोली, गाजर आणि बीट खा.

 • गूळ मिसळून भाजलेले हरभरे खाल्ल्याने हिमोग्लोबिनमध्ये झपाट्याने वाढ होते.

Web Title: Age After 40 Women Face Iron Deficiency Anemia Reasons Of Decreasing Hemoglobin Health

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..