Recipe : मसालेदार छोले मटर कुलचे; घरीच बनवण्यासाठी सोपी रेसिपी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chole kulche or matar kulcha recipe

Recipe : मसालेदार छोले मटर कुलचे; घरीच बनवण्यासाठी सोपी रेसिपी

छोले मटार कुलचा ही रेसिपी चवीला स्वादिष्ट लागते. मटर कुलचा खाताना तितकेच मजेदार लागतो असे अनेक खाद्यप्रेमी सांगतात. हा पदार्थ बनवण्यासाठी सोपे असून तुम्हालाही असा एखादा चविष्ट स्ट्रीट फूड घरच्या घरी ट्राय करायचा असेल तर ही रेसिपी फॉलो करा. अनेकांना आवडणारी आणि काही क्षणात तयार होणारी ही छोले मटार कुलचा ही रेसिपी कशी तयार करावी हे आपण आज पाहणार आहोत...

रेसिपी बनवण्यासाठी साहित्य -

 • 2 कप सुके वाटाणे 6 तास भिजत ठेवा

 • 2 हिरव्या मिरच्या

 • 1 कप बारीक चिरलेला कांदा

 • 1 कप बारीक चिरलेला टोमॅटो

 • 1 टीस्पून लिंबाचा रस

 • 1/2 टीस्पून आमचूर पावडर

 • 2 चमचे चाट मसाला

 • 1/4 टीस्पून गोड सोडा

 • 1/4 टीस्पून हळद

 • 1/2 कप बारीक चिरलेली कोथिंबीर

 • चवीनुसार मीठ

कुलचा बनवण्यासाठी -

 • 200 ग्रॅम मैदा

 • 1/4 कप दही

 • 1/4 टीस्पून बेकिंग सोडा

 • 1 टीस्पून साखर

 • 1 टीस्पून कसुरी मेथी

 • 1 टीस्पून हिरवी धणे

 • चवीनुसार मीठ

हेही वाचा: गुगल सर्चिंगबाबत 'ही' चूक करत असाल तर तुम्हालाही तुरुंगात जावं लागेलं..

कृती-

कुलचा बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात 200 ग्रॅम सर्व पीठे चाळून घ्या. त्यात अर्धी वाटी दही, एक चमचा साखर, एक चमचा खायचा सोडा आणि चवीनुसार मीठ टाकून एकत्र मिसळा. आता कोमट पाण्याने हे पीठ मऊ पद्धतीने मळून घ्या. आता हे तयार पीठ कापडाने झाकून 5 तास बाजूला ठेवा. सुमारे 5 तासांनंतर पीठ कुलचा बनवण्यासाठी तयार होईल.

आता प्रेशर कुकरमध्ये वटाणे, गोड सोडा, अर्धा चमचा हळद, थोडे मीठ आणि २ कप पाणी एकत्र करून मध्यम आचेवर उकळण्यासाठी ठेवा. वाटाणे उकळण्यासाठी 4-5 शिट्ट्या करा. कुकरचे प्रेशर संपल्यानंतर झाकण उघडून मटार मॅश करा. आता त्यात कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, चाट मसाला, आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ घालून चांगले मिक्स करून त्यात लिंबाचा रस घालून ५ मिनिटे मंद आचेवर शिजवा.

हेही वाचा: Chanakya Niti : तरुणांनो! उज्ज्वल भविष्याच्या विचारात असाल तर 'या' गोष्टींपासून दूर रहा

मटर चाट एका भांड्यात काढून हिरव्या कोथिंबिरीने सजवा. यानंतर, आधीच मळलेले पीठ पुन्हा मळून घ्या आणि त्याचे 12-15 समान गोळे करा. आता एक गोळा घेऊन त्याला जाडसर गोल पोळीसारखा आकार देत त्यावर कसुरी मेथी आणि थोडी कोथिंबीर टाकून दाबून घ्या. आता मध्यम आचेवर तवा गरम करून त्यात थोडे तेल घालून ग्रीस करा. आता गुंडाळलेला कुलचा तव्यावर ठेवून दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. कुलचा भाजल्यानंतर प्लेटमध्ये ठेवा आणि मटार बरोबर सर्व्ह करा.

Web Title: Chole Kulcha Or Matar Kulche Recipe How To Cook At Home Street Style In Marathi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..