

AI Powered Cough Test for TB
sakal
AI-Powered TB Screening in Rajasthan: क्षयरोगाच्या (टीबी) संशयित रुग्णांची लवकर ओळख, निदान आणि उपचार सुरू करण्यासाठी राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केला जात आहे. खोकल्याच्या आवाजातील सूक्ष्म संकेत ओळखण्याबरोबरच एखाद्या भागातील सामाजिक व लोकसंख्याशास्त्रीय वैशिष्ट्यांच्या आधारे क्षयरोगाचा अधिक धोका असलेल्या समूहांचीही ‘एआय’रच्या माध्यमातून ओळख पटवली जात आहे.