AI Revolution in Fetal Medicine
sakal
आरोग्य
AI Revolution in Fetal Medicine: फीटल मेडिसिनमध्ये एआयची क्रांतिकारी कमाल; आता गर्भातील बाळावरही उपचार शक्य
Breakthrough in Fetal Medicine: एआय तंत्रज्ञानामुळे फीटल मेडिसिनमध्ये अचूक निदान व गर्भातील बाळावर उपचार करणे आता अधिक प्रभावी आणि शक्य झाले आहे.
AI-Powered Fetal Scans: 'फीटल मेडिसिन' ही गर्भातील बाळाच्या वाढीदरम्यान उद्भवणाऱ्या विविध समस्यांचे निदान व उपचार करणारी शाखा म्हणून उदयास येत आहे. आता त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने गर्भाशयातील बाळामधील समस्यांचे निदान करता यावे, यासाठी चेन्नईतील 'मेडिस्कॅन सिस्टीम'च्या माध्यमातून एक संशोधन सुरू आहे. मशिन लर्निंग अल्गोरिदमच्या मदतीने प्रतिमांचा अभ्यास करणे व हे सोनोग्राफी मशिनमध्ये अंतर्भूत करण्यावर हा अभ्यास सुरू आहे. असे झाल्यास गर्भातील बाळांच्या समस्या ओळखता येणे शक्य होईल, अशी माहिती चेन्नई येथील 'फीटल मेडिसिन' तज्ज्ञ डॉ. एस. सुदर्शन यांनी दिली.
