
Air Pollution India: वायू प्रदूषणाच्या समस्येने गंभीर रूप धारण केले असून देशातील १.४ अब्ज एवढे लोक हे ज्या ठिकाणी धुलिकणांच्या प्रदूषणाचे प्रमाण हे सरासरीपेक्षा अधिक आहे त्या भागात वास्तव्यास असल्याचे दिसते.
दूषित हवेमुळे त्यांच्या आयुष्यातील साडेतीन वर्षे कमी होत असल्याचे दिसून आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) याबाबत निश्चित केलेल्या नियमांचा या ठिकाणी कधीच भंग झाला आहे.
अगदी देशातील सर्वाधिक स्वच्छ हवा असलेल्या प्रदेशात ‘डब्लूएचओ’च्या मानकांची पूर्तता केल्यानंतरही लोकांना ९.४ महिन्यांचेच अतिरिक्त आयुर्मान लाभू शकते, असा दावा ताज्या अहवालामध्ये करण्यात आला आहे.