

Winter Health
sakal
आखाडा बाळापूर : सध्या कडाक्याची थंडी सुरू झाली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेकांनी उबदार कपडे खरेदी केले. तर, शेकोटीचाही आनंदही नागरिक घेत आहेत. परंतु, या हुडहुडीच्या दिवसांत हृदयालाही जपावे लागणार आहे. आखाडा बाळापूरमध्ये ४० वर्षे वय असलेल्या दोघांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.