

Impact of Alcohol on Brain and Mental Health
sakal
Alcohol Effects on Brain: दैनंदिन धावपळीच्या जीवनातून थोडा वेळ काढण्यासाठी किंवा मित्रमैत्रिणींसोबत विकेंडला पेग घेण्यासाठी अनेकांना आवडते. महिन्यातून एकदा किंवा दोनदा तरी तुमचाही असा प्लॅन होतच असेल. एका संशोधनानुसार, ८४% प्रौढ व्यक्ती आयुष्यात कधीतरी दारूचे सेवन करतात.
पण डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अगदी थोडीशी दारू देखील आपल्या मेंदूवर दीर्घकालीन परिणाम करू शकते. आणि जर तुम्ही वारंवार आणि जास्त प्रमाणात दारूचे सेवन करत असाल, तर त्याचे परिणाम अत्यंत गंभीर होऊ शकतात. यासंदर्भात डॉक्टरांनी महत्त्वपूर्ण आणि सविस्तर माहिती दिली आहे ती जाणून घेऊया.