Vajrasana Benefits: जेवल्यावर लगेच करता येणारे एकमेव आसन! जाणून घ्या वज्रासनाचे जबरदस्त फायदे

How to do Vajrasana for Gas and Indigestion: वज्रासन हे जेवल्यानंतर लगेच करता येणारे एकमेव आसन असून ते पचन सुधारते आणि मानसिक शांती देते.
Benefits of Vajrasana
Benefits of Vajrasanasakal
Updated on

Simple yoga pose for digestion and mental calmness: वज्रासन हे एकमेव असे आसन आहे, जे जेवणानंतर त्वरित करू शकतो. हे आसन केल्याने शरीर सुडौल होते. तसेच वजन कमी करण्यात मदत करते.

ज्या महिलांना मासिक पाळीचा त्रास होतो किंवा पाळी अनियमित येते, त्यांनी नियमित वज्रासन करावे. विद्यार्थ्यांनी मनाची एकाग्रता वाढविण्यास नियमित वज्रासन करावे. अपचन किंवा पोटाचे इतर आजार असल्यास वज्रासनाने दूर होतात. शरीरावरची अधिक चरबी घटविण्यास आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास वज्रासन खूप उपयुक्त आहे.

Benefits of Vajrasana
Bhujangasana Benefits: महिलांसाठी वरदान ठरणारं आसन; जाणून घ्या 'भुजंगासना'चे आरोग्यदायी फायदे!

योग्य पद्धत

वज्रासन करताना जमिनीवर बसून दोन्ही पाय पुढे घ्यावे. नंतर उजवा पाय दुमडून बसावे. पायाचा पंजा मागे आणि वरच्या बाजूने असावा. डावा पायसुद्धा तसाच दुमडून घ्यावा. दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना जुळवून घ्यावे. टाचांमध्ये थोडे अंतर ठेवावे. दोन्ही हात गुढघ्यांवर ठेवावे आणि शरीर हळूहळू सैल सोडावे.

डोळे बंद करून हळूहळू लांब श्‍वास घ्यावा व त्याच स्थितीत थोडा वेळ बसून राहावे. सुरुवातीला 2 ते 5 मिनिटेच हे आसन करावे. गुडघ्यांचे किंवा टाचांचे दुखणे असलेल्यांनी वज्रासन करायचे टाळावे. तसेच वज्रासन करताना अशक्तपणा जाणविल्यास किंवा चक्कर आल्यास डॉक्‍टरचा सल्ला घ्यावा.

Benefits of Vajrasana
Yoga for Busy Lifestyle: धावपळीच्या जीवनात शरीर अन् मनाच्या आरोग्यासाठी ‘षट्क्रिया’ आणि योगाचे अद्भुत लाभ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com