
Amit Shah’s Fitness Mantra: दरवर्षी १९ एप्रिल रोजी जागतिक यकृत दिन साजरा केला जातो. हा दिवस यकृताच्या आरोग्यविषयी जागरूकता पसरवण्यासाठी साजरा कला जातो. याच निमित्ताने दिल्लीत आयोजित ‘इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बिलिअरी सायन्सेस’च्या कार्यक्रमात संवाद साधताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबाबत माहिती दिली. तसेच आपल्या देशातील तरुणाईला त्यांच्या आरोग्याविषयी जागरूक राहण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी त्यांचा आरोग्यमंत्रही सांगितला, तो काय आहे ते पुढे जाणून घेऊया.