गौरी शिंगोटेखाद्यपदार्थांवरील लेबलवरच्या काही घटकांचे विश्लेषण आपण गेल्या आठवड्यात बघितले. आता इतर काही गोष्टी बघूया..लेबलचा खरा अर्थबरीच खाद्य उत्पादने आरोग्य फायद्याची जाहिरात करतात. सामान्यरीत्या लेबलचा काय अर्थ आहे पाहू :कमी कॅलरी : याचा अर्थ पदार्थाच्या प्रत्येक भागवाटपामध्ये जास्तीत जास्त ४० कॅलरीज आहेत. काही कमी कॅलरी उत्पादनात कृत्रिम साखर किंवा अतिरिक्त पदार्थ वापरलेले असतात जे जास्त प्रमाणात घेतल्यास अपायकारक ठरतात.शुगर-फ्री किंवा साखरमिश्रित नाही : ‘शुगर-फ्री’ म्हणजे प्रत्येक भागवाटपात ०.५ ग्रॅम्सपेक्षा कमी साखर असते; परंतु तरीसुद्धा या उत्पादनांमध्ये कृत्रिम गोडवा वापरलेला असतो. ‘साखरमिश्रित नाही’ याचा अर्थ उत्पादननिर्मिती करताना साखर वापरलेली नाही- तरीही पदार्थात नैसर्गिक साखर असू शकते..जास्त तंतुजन्य पदार्थ : ज्या उत्पादनांवर ‘जास्त तंतुजन्य पदार्थ’ असे लिहिलेले असते- त्यात प्रत्येक भागवाटपात निदान ५ ग्रॅम्स तंतुजन्य पदार्थ असतात. कृत्रिमरीत्या वापरलेल्या तंतुजन्य पदार्थांपासून सावध राहा- कारण यामुळे पचनात अडथळा होऊन नैसर्गिक तंतुजन्य पदार्थांमुळे होणारे फायदे होत नाहीत.ग्लुटेन-फ्री : ‘ग्लुटेन फ्री’ लेबल असलेल्या पदार्थात ग्लुटेन म्हणजे गव्हातील प्रथिने ही दहा लक्ष भागांत २० भाग इतके असते. ग्लुटेन-फ्री उत्पादने ही प्रक्रिया केलेली व भरपूर प्रमाणात साखर वा स्निग्धपदार्थ मिश्रित असतात.सूचना : ग्लुटेन-फ्री आहार हा वैद्यकीयदृष्ट्या सेलिआक रोगावर रुग्णाला लिहून देण्यात येतो.दिशाभूल कणाऱ्या दाव्यांपासून सावधकाही खाद्यपदार्थांवरील लेबले एक ‘आरोग्यवलय’ निर्माण करून प्रत्यक्षापेक्षा जास्त निरोगी दर्शवतात. अशा लेबलकडे जास्त सजगपणे पाहा..आदर्शनगरमध्ये ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबिर.‘फळापासून बनवले आहे’ : हा दावा दिशाभूल करणारा असू शकतो. यामध्ये फळांचा दाट रस किंवा साखर घालून तयार केलेला दाट रस (पाक) मिसळलेला असतो. यामध्ये ताज्या फळांपेक्षा पोषणतत्त्वे व तंतुजन्य पदार्थ खूपच कमी प्रमाणात असतात.संपूर्ण धान्य : साहित्यसूची वाचा. संपूर्ण गव्हासारखे संपूर्ण धान्य सूचीमध्ये वरच्या स्थानी हवे. नुसते संपूर्ण धान्य म्हटल्याने १०० टक्के संपूर्ण धान्य बनत नाही.शून्य कृत्रिम चरबी : पदार्थात ०.५ ग्रॅम्सपेक्षा कमी प्रति भागवाटप या प्रमाणात असल्यास उत्पादक शून्य कृत्रिम चरबीचा दावा करू शकतात. हे मार्गारिन, गोठवलेले तयार पदार्थ आणि बेकरीतील पदार्थांसाठी सहसा लागू होते. सूचीमध्ये ‘अंशतः हायड्रोजनेटेड तेल’ असे लिहिलेले आढळल्यास कृत्रिम चरबीचे अस्तित्व दर्शवते.हलके : उत्पादनात ‘हलके’ हा उल्लेख कमी कॅलरी, चरबी, सोडियम (पर्यायाने मीठ) असा होतो; परंतु ‘हलके’ यासाठी कोणतेही जागतिक प्रमाण नाही. नेहमी आपल्या आहारतक्त्यातील गरजा भागवणारे पोषणतत्त्व हलके या दाव्याने होते हे तपासावे..Health Tips : शरीरातील बॅड कोलोस्टेरॉल कमी करायचा आयुर्वेदीक फंडा, भाकरी करण्याआधी इतकच करा.स्मार्ट कानमंत्रउत्पादनाची तुलना करादोन सारख्याच उत्पादनांमधून निवड करायची झाल्यास पोषणतथ्य सूची वाचून कॅलरी, प्रथिन, चरबी, साखर व सोडियमच्या प्रमाणांची तुलना करा.दैनंदिन उपयुक्तता (डीव्ही) टक्केवारी आपल्या दृष्टिकोनातून वापराएखादे उत्पादन विशिष्ट पोषणतत्त्वामध्ये कमी किंवा जास्त प्रमाण आहे हे डीव्ही टक्केवारीमुळे पटकन समजून येते. जीवनसत्त्व आणि तंतुजन्य पदार्थांसाठी जास्त डीव्ही टक्केवारी आणि सोडियम व अतिरिक्त साखरेसाठी कमी टक्केवारीची दैनंदिन उपयुक्तता (डीव्ही) निवडा.जास्त प्रक्रिया केलेले साहित्य टाळा‘जास्त फ्रुक्टोज काॅर्न सिरप’ किंवा ‘हायड्रोजनेटेड तेल’ आणि ‘कृत्रिम रंग व स्वाद’ ही खूपच जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेल्या पदार्थांची लक्षणे आहेत. शक्यतो साधे संपूर्ण-खाद्य साहित्य असलेले पदार्थ निवडा..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.