Best Water Vessel : RO- फिल्टर येण्याआधी लोक या 6 प्रकारच्या भांड्यांमध्ये पाणी ठेवायचे, कारण...

शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की नव्या टेक्नॉलॉजीच्या माध्यामातून तयार झालेले हे उपकरण पाण्यातील घाण आणि जंतू काढून टाकते आणि ते शुद्ध करते
Best Water Vessel
Best Water Vesselsakal

Best Water Vessel : तंत्रज्ञानाच्या आगमनानंतर पिण्याचे पाणी RO किंवा फिल्टरमध्ये साठवले जाते. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की नव्या टेक्नॉलॉजीच्या माध्यामातून तयार झालेले हे उपकरण पाण्यातील घाण आणि जंतू काढून टाकते आणि ते शुद्ध करते. मात्र यातून काही महत्वाचे पोषक तत्व वगळले जातात.

प्राचीन काळी पाणी साठवण्यासाठी वेगवेगळ्या धातूंच्या भांड्यांचा वापर केला जात असे. या पदार्थांचे पाणी 'अमृत' समजले जात होते, कारण ते शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. जुन्या काळातील लोक या पदार्थांचे पाणी प्यायचे आणि आपल्यापेक्षा अधिक निरोगी आणि उत्साही राहत.

आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. वरलक्ष्मी यांनी सांगितले की, आयुर्वेदात पाणी पिण्यासाठी चांगल्या पात्राविषयी सांगितले आहे. वेगवेगळ्या धातूंमध्ये ठेवलेल्या पाण्याचे गुणधर्मही बदलले. चला जाणून घेऊया पिण्याचे पाणी कोणत्या भांड्यात ठेवावे आणि त्याचे काय फायदे आहेत?

Best Water Vessel
Best Water Vessel

कोणत्या भांड्यात पाणी ठेवावे

सोन्याच्या भांड्यात पाणी ठेवण्यचे फायदे

सोन्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी थंड असते आणि त्याची चव गोड असते. ते तुमची प्रतिकारशक्ती, शक्ती, मन आणि प्रजनन क्षमता वाढवते. राजे-सम्राट सोन्याच्या भांड्यातच पाणी प्यायचे.

तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे फायदे

तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्याचा प्रभाव उबदार आणि चवीला गोड असतो. त्यामुळे शरीरातील अंतर्गत उष्णता वाढण्यास मदत होते. ज्यामुळे अशक्तपणा आणि लोहाची कमतरता दूर होऊ शकते. ते थंड हवामानात वापरणे आवश्यक आहे.

मातीच्या भांड्यात पाणी पिण्याचे फायदे

आजही काही घरांमध्ये पाणी साठवण्यासाठी मातीचे भांडे वापरले जातात. याचा थंड प्रभाव असतो आणि शरीरातील उष्णता संतुलित ठेवते. त्यामुळे अॅसिडिटी आणि गॅस्ट्रिकच्या समस्येवर मात करता येते. उन्हाळ्यात याचा वापर करणे फायदेशीर ठरते.

Best Water Vessel
Water In Copper Vessel : तांब्याच्या भांड्यातून पाणी प्या पण जरा जपून,कारण..

जुने लोक या भांड्यात पाणी उकळायचे

आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते, प्राचीन काळी उंबराच्या झाडाच्या लाकडापासून भांडी बनवली जात होती. यामध्ये पाणी उकळले होते, यात पाणी दीर्घकाळ थंड राहायचं.

या भांड्यात पाणी पिणे विष पिण्यासारखेच

आयुर्वेदानुसार पिण्याचे पाणी लोखंडाच्या भांड्यात ठेवू नये. त्यामुळे त्वचेच्या समस्या निर्माण होतात. तर पितळेत ठेवलेले पाणी चांगले असते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते. आपण चांदीच्या भांड्यात ठेवलेले पाणी देखील पिऊ शकता, ज्याचा थंड प्रभाव असतो. (Drinking Water)

Best Water Vessel
Hot Water Side Effects : वजन कमी करण्यासाठी कोणाचंही ऐकून गरम पाणी पिऊ नका? आधी हे वाचा!

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारित असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com