
Antibiotic-Resistant Kidney Infections
sakal
सततचा होणारा मूत्र संसर्ग (युरीन इन्फेक्शन), ताप न उतरणे, पाठीच्या भागात दुखणे ही लक्षणे वरकरणी सामान्य वाटतात. ती औषधे घेऊनही बरी होत नाहीत. मग, ही बाब सामान्य नसून, त्याकडे गांभीर्याने पाहायला हवे. कारण ही लक्षणे मूत्रपिंड (किडनी) संसर्गाची असून, त्याने मूत्रपिंडाचे विकार वाढू शकतात किंवा ते निकामीदेखील होऊ शकते. प्रतिजैविकांच्या प्रतिरोधाचा (अँटिबायोटिक रेजिस्टंस) मूत्रपिंडावर परिणाम होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.