
Experts warn Indian women about the growing risk of heart disease often ignored as an ‘invisible crisis’.
Sakal
हृदयविकार हा भारतीय महिलांमधील मृत्यूचे प्रमुख कारण म्हणून समोर येत आहे. जवळजवळ १७ टक्के महिलांच्या मृत्यूला तो जबाबदार ठरत आहे; तरीसुद्धा भारतीय महिलांमध्ये याबाबतचा धोका ओळखण्याची जागरूकता मात्र अत्यंत कमी असून हे धक्कादायक आहे. हृदयरोग तज्ज्ञांच्या माहितीनुसार महिलांमधील संप्रेरकांमधील (हार्मोनल) बदल, चुकीच्या जीवनशैलीचा अवलंब आणि वेळेवर तपासण्याचा अभाव या कारणांमुळे भारतीय महिला अधिकाधिक हृदयविकारांना बळी पडताना दिसून येत आहेत.