

Health and Wellness During Diwali Why Physical Strength Good Digestion and Healthy Habits Are the Real Lights of Life
sakla
दीपावली या शब्दाचा अर्थ आहे दिव्यांच्या रांगा, आवली म्हणजे ओळी. घराबाहेर अनेक पणत्या, रोषणाईचे दिवे लावले जातात तो हा सण. मेकअप करून आणलेले उसने तेज हा काही खरा प्रकाश नव्हे. हातापायात ताकद असणे, शरीरसौष्ठव आणि सुंदर केशसंभार असणे, डोळे तेजस्वी, मुंग्यांचे बोलणे ऐकू शकणारे कान व अक्रोड फोडू शकणारे दात असणे आणि षड्रसपूर्ण आहार स्वीकारण्याची शरीराची, चवीची व पचनाची क्षमता शाबूत असणे, जीवनाचा सहचर्यानंद लुटता येण्याची क्षमता असणे ही झाली शरीराची रोषणाई.