आरोग्यदायी कोहळा

आयुर्वेदात श्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या कोहळ्याचे मेंदू, मूत्रपिंड, पित्तशामक व रक्तस्राव कमी करणारे गुण; अभ्यासू मुलांपासून मधुमेह, किडनी स्टोनग्रस्तांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त भाजी
Nutritional Powerhouse: Understanding the Science Behind Kushmanda (Ash Gourd)

Nutritional Powerhouse: Understanding the Science Behind Kushmanda (Ash Gourd)

Sakal

Updated on

डॉ. मालविका तांबे

एकविसाव्या शतकातल्या बऱ्याचशा मंडळींना कोहळा म्हणजे काय हेच कदाचित माहिती नसावं. आयुर्वेदाप्रमाणे वेलीवर लागणाऱ्या भाज्यांमध्ये सगळ्यात उत्तम कोहळा असतो. याला संस्कृतमध्ये कुष्मांड असं पण म्हटलं जातं. दिसण्यात हा काकडी आणि भोपळ्याचं मिश्रण आहे असं म्हणता येईल. गोल भोपळ्यासारखं मोठं दिसणारं कोहळ्याचे फळ हलक्या हिरव्या रंगाचं असतं. वजनाने अतिशय जड आणि कापल्यावर आतमध्ये पांढरा गर दिसतो. आणि त्या गरात लहान पांढऱ्या बिया असतात. याची पानं खरखरीत असतात. याची फुलं आकाराने मोठी व पिवळ्या रंगाची असतात. फळांवर पांढरी दाट लव असते. कोहळ्याच्या बिया, पानं, मूळ, फुलं सगळ्यांमध्ये औषधी गुणधर्म असतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com