Teeth Whitening Home Remedies: पिवळ्या दातांची लाज वाटतेय; मग डेंटिस्टने सूचविलेले 'हे' तीन उपाय नक्की ट्राय करा!

Simple Home Remedies for Yellow Teeth: पिवळे दात आणि तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी डेंटिस्टने दिलेले ३ सोपे आणि घरगुती उपाय जाणून घ्या.
Dentist Recommended Teeth Whitening Tips
Dentist Recommended Teeth Whitening Tipssakal
Updated on

How to Keep Teeth Clean and White Naturally: बऱ्याचदा दात स्वच्छ आणि दिवसातून दोन वेळा घासून सुद्धा दात पिवळे राहतात अशी समस्या अनेकांना उद्भवत असते. हे फक्त दिसण्यासाठीच नाही तर आरोग्याच्या दृष्टीने देखील वाईट असते. ही दातांवर साचणारी पिवळी घाण पायरीया, हिरड्या सुजणे, रक्त येणे, दात किडणे आणि कधी कधी सेन्सिटिव्हिटी होऊन वेदना होणे अशा अनेक समस्यांसाठी कारणीभूत ठरते. या घाणीतून प्लॅक तयार होतो आणि वेळेत स्वच्छता नाही केली तर त्याचे टार्टरमध्ये रूपांतर होतो. परिणामी दातांचे आरोग्य बिघडते.

तुम्हाला या समस्यांना सामोरे जात येऊ नये आणि तुमचे दातांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी अपोलोच्या डॉ. सोनिया भट्ट यांनी काही नैसर्गिक आणि सोपे उपाय सांगितले आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया.

दात पिवळे का पडतात?

सर्वात आधी दात पिवळे पडण्याची कारणे जाणून घेऊया.

  • चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक, रेड वाईन यांचे जास्त प्रमाण

  • साखर किंवा गोड पदार्थांचे अधिक सेवन

  • ब्रश व फ्लॉस न करणे

  • धूम्रपान व तंबाखूचा वापर

  • तोंड स्वच्छ न ठेवणे

Dentist Recommended Teeth Whitening Tips
Heart Risk from Poor Oral Hygiene: रात्री दात घासले नाही तर हृदयविकाराचा धोका वाढू शकतो का? वाचा डॉक्टर काय सांगतात

दात पिवळे राहिल्यास काय तोटे होतात?

  • तोंडाची दुर्गंधी

  • किड, पोकळी आणि वेदना

  • हिरड्यांचे आजार

  • दात कमकुवत होणे

  • पचनावर परिणाम

  • दात गळण्याची शक्यता

डेन्टल प्लाक

आपण अन्न खातो तेव्हा त्या अन्नाचे छोटे छोटे कण दातांवर (teeth) चिकटतात. जर आपण नीट दात घासले नाही किंवा वेळोवेळी व्यवस्थित चूळ भरून तोंड स्वच्छ केले नाही, तर हे घाण तशी राहते आणि हळूहळू जाड थर तयार व्हायला सुरुवात होते, ज्याला प्लाक असे म्हणतात.

ही घाण जर जास्त दिवस दातांवर राहिली तर तिचे रूपांतर टार्टरमध्ये होते. ज्यामुळे दात पिवळे दिसतात. परिणामी दात खराब होतात आणि तोंडातून घाण वास येऊ लागतो.

टार्टरमुळे होणाऱ्या समस्या

टार्टर दातांच्या मुळांपर्यंतही पोहोचू शकतो. त्यामुळे हिरड्यांचे सूज येणे, त्यांतून रक्त येणे, कधी कधी दात हलू लागणे, दात किडणे आणि तोंडाला वास येणे अशा समस्या उद्भवतात. एवढेच नाही तर तुमचे दातही पडू शकतात. म्हणून दात निरोगी ठेवायचे असतील तर दातांवरची ही पिवळी घाण म्हणजेच प्लॅक आणि टार्टर वेळेवर साफ करणे खूप महत्त्वाचे आहे.

Dentist Recommended Teeth Whitening Tips
Kids Dental Hygiene: दररोज दात घासूनही मुलांचे दात का किडतात? ही असू शकतात कारणं

अपोलो हॉस्पिटलच्या डेंटिस्टने सूचविलेले तीन उपाय

आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करा

सफरचंद , स्ट्रॉबेरी, गाजर, काकडी अशा फळ-भाज्यांमध्ये दात स्वच्छ ठेवण्याचे नैसर्गिक गुण असतात. या गोष्टी चावून खाल्ल्याने दातांवरची पिवळी घाण हळूहळू कमी होते आणि तोंड ताजे वाटते. म्हणून रोजच्या जेवणात अशा फळ-भाज्यांचा जरूर समावेश करा.

प्रत्येक जेवणानंतर चूळ भरा

खूप लोक जेवणानंतर चूळ भरून तोंड धुणे विसरतात. त्यामुळे अन्नाचे छोटे कण दातात अडकतात आणि हळूहळू घाण साचते. म्हणून जेवण झाल्यावर स्वच्छ पाण्याने चूळ भरण्याची सवय लावणे खूप गरजेचे आहे.

डेंटिस्टकडे वेळेवर सल्ला घ्या

घरी उपाय करून फरक न पडल्यास डेंटिस्टकडे जाऊन प्रोफेशनल ट्रीटमेंट घ्यावी. डेंटल स्केलिंग किंवा ब्लीचिंगसारख्या उपचारांमुळे दात पुन्हा एकदा चमकदार दिसू शकतात. चुकीचे घरगुती उपाय वापरल्यास नुकसान होण्याची शक्यता असते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com