Heart Risk from Poor Oral Hygiene: रात्री दात घासले नाही तर हृदयविकाराचा धोका वाढू शकतो का? वाचा डॉक्टर काय सांगतात

What Is The Connection Between Night Time Brushing And Heart Diseases: रात्री दात न घासल्यास तोंडातील जंतूंमुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो, असा हार्वर्ड विद्यापीठातील डॉक्टरांचा इशारा आहे.
Nighttime Oral Care & Heart Health
Nighttime Oral Care & Heart Healthsakal
Updated on

Can Skipping Nighttime Brushing Increase Heart Disease Risk: आपल्याला लहानपणापासून रात्री झोपण्यापूर्वी दात घासण्याची सवय लावली जाते. परंतु आपण जसेजसे मोठे होतो तशी ही सवय मोडत जाते.

रोजच्या धावपळीत किंवा थकव्यामुळे बरेचजण रात्री झोपताना दात घासण्याचा कंटाळा करतात. मात्र ही सवय केवळ दातांसाठी नाही, तर आपल्या हृदयासाठीही घातक ठरू शकते, असे हार्वर्ड आणि स्टॅनफर्ड विद्यापीठांत शिक्षण घेतलेल्या डॉक्टर सौरभ सेठी यांचे म्हणणे आहे.

त्यांच्या मते, तोंडातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याठिकाणी हानिकारक जंतू जमा होऊ लागतात. हे जंतू रक्तप्रवाहात प्रवेश करून जळजळ होणे, सूज येणे यासाठी कारणीभूत ठरतात. जे हृदयविकार होण्यासाठी जबाबदार असते.

Nighttime Oral Care & Heart Health
Deepika Kakkar’s Liver Cancer: जेवण बनवण्याच्या पद्धतीच बेततात जीवावर? दीपिका कक्करला लिव्हर कॅन्सर; जाणून घ्या कारणे

हृदयाच्या आरोग्यासाठी दातांची स्वच्छता का महत्त्वाची आहे?

डॉ. सेठी यांनी त्यांच्या इंस्टग्रामवर शेअर केलेल्या पोस्ट मध्ये असे सांगितले आहे की, तोंडातील जंतू जर रक्तात मिसळले, तर त्याचा थेट परिणाम आपल्या हृदयावर होऊ शकतो. त्यामुळे हृदयविकार, अचानक झटका येणे किंवा इतर गंभीर आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो.

तोंडाची स्वच्छता फक्त दातांसाठीच नाही, तर आपल्या एकूण आरोग्यासाठीही तितकीच महत्त्वाची आहे. विशेषतः हिरड्यांमध्ये जर वारंवार सूज येत असेल, रक्त येत असेल, तर हे लक्षण सहज दुर्लक्ष करण्यासारखं नाही. कारण संशोधन असे सांगते की, अस्वच्छतेमुळे होणारे हे हिरड्यांचे आजार (गम डिसीज) आणि हृदयविकार यांचा परस्पर संबंध असू शकतो.

या तीन गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे

- तोंडातील जीवाणू जर रक्तप्रवाहात गेले, तर ते हळूहळू हृदयावर परिणाम करू शकतात आणि त्यामुळे शरीरात जळजळ निर्माण होऊन हृदयाचे नुकसान होण्याची शक्यता वाढते.

- हिरड्यांशी संबंधित आजार, जे बहुतेक वेळा दातांची योग्य काळजी न घेतल्यामुळे होतात, त्यांचा संबंध हृदय व रक्तवाहिन्यांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या समस्यांशी जोडला जातो.

- जे लोक दररोज नीट दात घासतात आणि नियमितपणे दातांची स्वच्छता करतात, त्यांचे हृदय तुलनेत जास्त निरोगी असते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

Nighttime Oral Care & Heart Health
Work Life Balance : कामानंतर ‘स्वतःसाठी वेळ’ का आवश्यक आहे? जाणून घ्या डिस्कनेक्ट होण्याचे फायदे

डॉ. सेठी यांच्या मत , रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे ही अशी एक सोपी, पण प्रभावी सवय आहे, जी तुमच्या हृदयाचं आरोग्य जपण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. ही सवय रोजच्या दैनंदिनीत समाविष्ट केली तर केवळ तुमचं तोंड स्वच्छ राहात नाही, तर दीर्घकाळापर्यंत हृदयविकारांसारख्या गंभीर आजारांपासूनही तुमचे संरक्षण होऊ शकते. त्यामुळे आजपासूनच ही चांगली सवय लावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com