
Can Autistic People Lead A Normal Life: ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर (ASD) हा एक न्यूरोडेव्हलपमेंटल विकार आहे, ज्याची लक्षणे सामान्यतः आयुष्याच्या सुरुवातीच्या दोन वर्षांमध्ये दिसून येतात. ऑटिझममुळे मुलांच्या संवाद कौशल्यावर, त्यांच्या वर्तणुकीवर, सामाजिक संबंधांवर तसेच इतर विकासात्मक कौशल्यांवर परिणाम होतो. त्यामुळे बऱ्याच पालकांच्या मनात प्रश्न असतो की, "ऑटिझम बरा होऊ शकतो का ?" आज जागतिक ऑटिझम जागरूकता दिनानिमित्त याबद्दल जाणून घेऊया.
सध्या ऑटिझमसाठी कोणतेही ठोस उपचार उपलब्ध नाहीत. मात्र, ऑटीझम असलेल्या मुलांसाठी काही प्रभावी उपचार आणि सुपूर्त प्रोग्रॅम्स उपलब्ध आहेत. जसे की लवकर निदान करणे, ABA (Applied Behavior Analysis) थेरपी, जी ऑटिझम असलेल्या मुलांच्या वर्तणुकीसाठी योग्य आणि उपयोजित विश्लेषण कसे करण्यासाठी मदत करते, तसेच स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपीसारख्या उपचारपद्धती मुलांना त्यांच्या आजूबाजूच्या जगाशी जुळवून घेण्यासाठी मदत करतात. काही ऑटिस्टिक व्यक्तींना आयुष्यभर मदतीची गरज लागते, तर काहीजण योग्य मार्गदर्शन आणि उपलब्ध सुविधांमुळे स्वावलंबी होऊ शकतात.
प्रत्येकाची 'सामान्य' जीवनाची संकल्पना वेगळी असते. अनेक ऑटिस्टिक व्यक्ती आनंदी आणि यशस्वी जीवन जगतात, करिअर घडवतात, नाती जपतात आणि आपली स्वप्नं पूर्ण करतात. ऑटिझम असलेल्या मुलांना किंवा व्यक्तींना आवश्यक असलेला आधार, योग्य शिक्षण, समाजाकडून स्वीकार आणि शाळेत व कामाच्या ठिकाणी योग्य सोयीसुविधा मिळाल्या तर ते सहज समाजाचा एक भाग बानू शकतात.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.