आहार‘मूल्य’ : आतड्यांचं आरोग्य आणि आहार

असं म्हटलं जातं, की एखाद्याच्या हृदयात जायचं असेल, तर ते पोटाच्या मार्गे जाता येतं. खरंच आपल्या आरोग्याचं आणि आतड्यांचं अगदी जवळचं नात आहे.
gut health and diet
gut health and dietsakal
Updated on
Summary

असं म्हटलं जातं, की एखाद्याच्या हृदयात जायचं असेल, तर ते पोटाच्या मार्गे जाता येतं. खरंच आपल्या आरोग्याचं आणि आतड्यांचं अगदी जवळचं नात आहे.

- अवंती दामले, आहारतज्ज्ञ आणि सल्लागार

असं म्हटलं जातं, की एखाद्याच्या हृदयात जायचं असेल, तर ते पोटाच्या मार्गे जाता येतं. खरंच आपल्या आरोग्याचं आणि आतड्यांचं अगदी जवळचं नात आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपलं आतडं आणि पचनसंस्था निरोगी ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण जे काही खात आहात त्याचं पचन आणि शोषण आतड्यांमध्ये होत असतं. त्याचबरोबर अन्नातील नको असणारे पदार्थ शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम शरीर करत असतं.

आतड्याच्या अनारोग्याची काही लक्षणं

अपचन ब्लोटिंग / पोटफुगी

गॅस बनणं उलट्या होणं

झोप कमी होणं रोगप्रतिबंधक शक्ती मंदावणं

जुलाब मलावरोध

मानसिक आरोग्यावर परिणाम होणं

आपल्या जीवनशैलीवर आपलं आतड्यांचं आरोग्य अवलंबून आहे. त्यासाठी

  • आपला आहार संतुलित असावा. त्यात कर्बोदकं, प्रथिनं, जीवनसत्त्वं, चोथा, पाणी, फॅट्स, क्षार या सर्वांचं योग्य प्रमाण ठेवावं.

  • आहारामध्ये प्रोबायोटिक म्हणजे आतड्यातील आवश्यक असे चांगले जीवाणू जे पचनाला मदत करतात, त्याचबरोबर बी-१२सारख्या जीवनसत्त्वाच्या शोषणासाठी, रोगप्रतिबंधकशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात- त्यांचा समावेश करावा. आहारात दही, ताक, आंबवलेले पीठ, कांजी, सॉकर वॉट (कोबी आंबवून), केफिट, कोंबुचा हा चहाचा प्रकार इत्यादी पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करावा.

  • चांगल्या प्रोबायोटिकयुक्त आहाराबरोबरच प्रिबायोटिक पदार्थांचा आहारात समावेश करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. उदा. तंतुमय भाज्यांचा वापर, विविध फळं, सालासकट फळं, संत्री, मोसंबी, मोड आलेली कडधान्यं, कोहळा, दुधीसारख्या वेलवर्गीय भाज्या, सालासकट किंवा कोंडायुक्त धान्यं इ. पदार्थांमुळे आहारातील प्रोबायोटिक जीवाणूंचं (आवश्यक असे चांगले जंतू) शोषण होण्यास मदत होते आणि आतड्याचं आरोग्य सुधारतं.

आतड्याच्या आरोग्यासाठी काही महत्त्वाचे बदल

१) आहारातून बिस्कीट, ब्रेड इ. बेकरीच्या मैदायुक्त पदार्थांचा वापर टाळावा. आहारात प्रोबायोटिक आणि प्रिबायोटिक या दोघांचा समावेश करावा.

२) शीतपेयं आणि अल्कोहोलयुक्त पेयं यांचा वापर टाळावा.

३) अतिप्रमाणात चहा आणि कॉफीसारख्या उत्तेजक पेयांचा वापर टाळावा.

४) तबाखूसेवन टाळावं.

५) जास्त प्रमाणात मांस टाळावं.

६) अनावश्यक औषधं टाळावीत.

७) बैठी जीवनशैली टाळून व्यायामाचा समावेश करावा.

८) वेळेवर झोपावं. रात्रीची अनावश्यक जागरणं टाळावीत.

९) जेवताना व्यवस्थित चर्वण करावं आणि जेवणाच्या वेळा पाळाव्यात.

१०) ताण-तणाव टाळावेत.

या सर्व बदलांमुळे आपल्या आतड्याचे आणि पचनसंस्थेचे आरोग्य सुधारून रोगप्रतिबंधकशक्ती वाढून निरोगी शरीरसंपदा प्राप्त होण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com