
Weight Loss Mistakes : वजन कमी करण्याच्या नादात लोक करतात या 3 चुका, मग वजन कमी कसे होणार?
Weight Loss Mistakes : पोट आणि कंबरेभोवतीची चरबी व्यक्तीच्या एकंदरीत सौंदर्यावर प्रभाव पाडते. यासोबतच लठ्ठपणामुळे अनेक गंभीर आजार होण्याचा धोका असतो. वजन कमी करण्यासाठी, आपल्याला स्ट्रीक्ट डाएट प्लान आणि जड व्यायामाचा अवलंब करावा लागतो.
परंतु बरेचदा आपण विचार न करता आणि कोणत्याही आरोग्य तज्ञाचा सल्ला न घेता वजन कमी करण्यासाठी डाएट प्लान करतो. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकरने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तिने सांगितले आहे की बारीक होण्याच्या नादात आपण कोणत्या 3 चुका करतो, ज्यामुळे सर्व मेहनत व्यर्थ जाते.
वजन कमी करताना अशा चुका करू नका
1. कार्बोहायड्रेट पदार्थ खाण्याची भीती
वेट लॉस डाएटमधे आपण कार्बोहायड्रेटला विलन म्हणूनच पाहतो आणि विचार करतो की हे पोषक घटक टाळल्यास वजन लवकर कमी होईल, अशा परिस्थितीत आपण घरी शिजवलेला भात, इडली, उपमा, पोहे यासारख्या गोष्टी खाण्यापासून दूर राहतो. असे प्रयत्न त्वरित थांबवले पाहिजेत. जर तुम्ही तुमच्या आहारातून कार्बोहायड्रेट पूर्णपणे काढून टाकले तर तुम्हाला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळणार नाही, ज्यामुळे तुम्हाला थकवा आणि सुस्तपणा जाणवेल.
2. बिंज ईटिंग डिसॉर्डर
बरेच लोक आपल्या शरीराबद्दल आणि सौंदर्याबद्दल सकारात्मक विचार करत नाहीत. वजन कमी करण्यासाठी ते स्वत: ला बराच वेळ उपाशी ठेवतात आणि नंतर एक अशी वेळ येते जेव्हा त्यांना खूप भूक लागते आणि ते खूप खायला सुरूवात करतात. असे करणे आरोग्यासाठी योग्य नाही.
3. डिसफंक्शनल एक्सरसाइज
वजन कमी करण्यासाठी भरपूर व्यायामाची गरज आहे यात शंका नाही, पण विचार न करता आणि फॅड म्हणून व्यायाम केल्याने काही परिणाम मिळत नाही. जेव्हा तुम्ही सकस आहार आणि पुरेशी झोप घ्याल तेव्हाच तुम्हाला व्यायामाचा फायदा मिळेल. (Health News)
या गोष्टींची काळजी घ्या
न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांच्या मते, जर तुम्ही वजन कमी करत असाल, तर चांगल्या परिणामांसाठी डाएट करण्याऐवजी घरीच बनवलेला सकस आहार घ्या. आपल्या शरीराला आवश्यक तेवढाच व्यायाम करा. (Weight Loss)