
International Foetal Alcohol Syndrome Day| Avoid Alcohol During Pregnancy
sakal
थोडक्यात:
गर्भावस्थेत मद्यपान केल्यास अल्कोहोल थेट बाळाच्या रक्तप्रवाहात जाऊन मेंदूच्या पेशींना कायमचे नुकसान करू शकते.
यामुळे ‘फीटल अल्कोहोल सिंड्रोम’ निर्माण होऊन बाळाला शिकण्यात, स्मरणशक्तीत आणि भाषिक विकासात अडचणी येऊ शकतात.
चेहऱ्यावरील व शरीरावरील विकृती, भावनिक अस्थिरता आणि वर्तनात्मक समस्या देखील या सिंड्रोममुळे दिसून येतात.
How Alcohol in Pregnancy Can Harm Your Baby: गर्भावस्थेतही मद्यपान करताय? तर हे थेट गर्भवतीच्या आरोग्यावरच नव्हे तर होणाऱ्या बाळावरही परिणाम करू शकते. अल्कोहोल थेट गर्भातील बाळाच्या रक्तप्रवाहात पोहचते. या टप्प्यावर शरीराचे आणि मेंदूचे अवयव अजून विकसित होणार असल्याने मद्याचा अंश मेंदूच्या पेशींना कायमचे नुकसान करतो आणि परिणामी बाळाला ‘फीटल अल्कोहोल सिंड्रोम’(एफएएस) निर्माण होऊ शकतो. अशा मुलांना शिकण्यात अडचणी, स्मरणशक्ती कमी, भाषिक विकासात उशीर, चेहऱ्यावर व शरीरावर विकृती, भावनिक अस्थिरता आणि वर्तनात्मक अडचणी दिसून येतात, अशी माहिती तज्ज्ञ देतात.