Awakening the Power of Womanhood
sakal
- डॉ. मालविका तांबे
नवरात्र उत्सव हा देवीशक्ती अर्थात स्त्रीशक्तीचा उत्सव. देवीच्या स्वरूपात आपण स्त्रीचे वेगवेगळी शक्तीची रूपे बघत असतो. आई, बहीण, बायको, मुलगी, मैत्रीण, नात वगैरे अनेक रूपांमध्ये स्त्री आपल्या आयुष्यात उपस्थित असते.
तिची मानसिक उदारता, सहनशक्ती, कुठलेही कार्य पूर्ण करण्याची इच्छाशक्ती, सगळ्या रूढी व परंपरा पालन व स्वीकारण्याची क्षमता मोठी असते. याच बरोबरीने ती सर्व कुटुंबाला एकत्रित ठेवताना आजच्या आधुनिक जगात केवळ घरचीच नव्हे तर बाहेरची जबाबदारी पाडताना दिसते.