तर काय ?

सहा वर्षांच्या मुलामध्ये भूक न लागणे, चुकीच्या खाण्याच्या सवयी, पचन विकार आणि आयुर्वेदानुसार बदल करण्याच्या पद्धतींचे मार्गदर्शन येथे दिले आहे.
Eating Habits That Affect Digestion and Hunger

Eating Habits That Affect Digestion and Hunger

Sakal

Updated on

माझा नातू सहा वर्षांचा आहे. त्याला कधीच भूक लागलेली नसते. काहीही अन्न खायला दिलं की सगळ्याला नकारच अaसतो. वरण, भात, भाज्या, तूप हे तर अगदीच आवडत नाही. पण दिलेलं दूधसुद्धा कधी पीत नाही. फक्त कोरडी तुपाशिवायची पोळी खायला तयार असतो. काय करावे? कृपया सुचवावे.

- सौ. सुनीता व्होरा. नागपूर

उत्तर : सर्वप्रथम मुलांच्या आवडी आणि नावडी यांच्याकडे लक्ष देणे पूर्णपणे बंद करायला पाहिजे. घरामध्ये केलेलं ताजे अन्न, वरण भात, भाजी, पोळी, चटणी, कोशिंबीर हे घरातल्या प्रत्येक सदस्याने खाणं बंधनकारक असलं पाहिजे. त्यामुळे त्याला जरी कोरडी पोळी आवडत असली तरी कोरडी पोळी मिळणार नाही हे जर का सक्तीने सांगितले आणि त्याला पाळायला लावले तरच त्याच्या खाण्या पिण्याच्या सवयी बदलू शकतील, तसेच जेवत असताना टीव्ही किंवा मोबाईल बघण्याची सवय असल्यास तेही संपूर्णपणे बंद करावे. त्याला भूक व्यवस्थित लागण्याकरिता काही दिवस संतुलनाचे बाल हर्बल सिरप व तसेच बिल्वसॅन हे दोन्हीही द्यायला सुरुवात करावी. पोटावर हलक्या हाताने अभ्यंग सेसमी तेल लावावे. त्याचं रोज पोट साफ होतंय ना याच्याकडे पण लक्ष द्यावे. दूध नियमित घेणे अत्यंत आवश्यक असते. त्याच्यामध्ये संतुलन चैतन्य कल्प किंवा अनंत कल्प घालून द्यायला सुरुवात करावी. प्रत्यक्ष मार्गदर्शन घेतल्यास पचनसंस्था शी संबंधित अजून कुठला त्रास आहे का, किंवा कुठल्या प्रकारची उपचाराची गरज आहे का, हेही निदान करता येऊ शकेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com