

Ayurvedic foot care practices to prevent and treat cracked heels for healthy feet.
Sakal
डॉ. मालविका तांबे
संपूर्ण शरीरात सगळ्यात दुर्लक्षित कुठला अवयव असेल तर ते असतात आपले पाय. पायांची स्वच्छता, पायांची निगा राखणं हे रोजच्या रोज कोणीच करत नाही. त्यातल्या त्यात फक्त नखं सुंदर दिसावी याकरता महिन्यातून एकदा किंवा दोनदा जाऊन पेडिक्युअर करणारे लोक आपल्याला त्यातल्या त्यात सापडतात. पण सामान्य जनतेमध्ये आपण पाहिलं तर पायांमध्ये भेगा पडणे व त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचं प्रमाण हे फार अधिक आढळतं. आयुर्वेदामध्ये पायामध्ये भेगा पडण्याला ''पायदारी'' अशी संज्ञा दिलेली आहे. पाद अर्थात पाय किंवा टाचा आणि दारी म्हणजे भेगा पडणे किंवा क्रॅक पडणं याला आयुर्वेदामध्ये क्षुद्र रोग असं सांगितलेलं आहे. कारण या रोगाचा, तसं पाहायला गेलं तर मोठा त्रास काही होत नाही. पण या भेगा जर का जास्त प्रमाणात वाढल्या त्यातून रक्त येऊ लागलं. त्या खूप दुखू लागल्या की मग मात्र दैनंदिन काम करणं सुद्धा अवघड होत जातं.