Understanding Obesity in Ayurveda
Sakal
डॉ. मालविका तांबे
आधुनिक जीवनशैली ही संपूर्ण जगभरामध्ये वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देत आहे. वजन जास्त प्रमाणात वाढणे हेसुद्धा त्यातलाच एक त्रास आहे. लठ्ठपणा किंवा वजन वाढणे हा त्रास काही नवीन नाही. हजारो वर्षांपूर्वी आयुर्वेदामध्ये सुद्धा वजन जास्त प्रमाणात वाढल्यास त्याला स्थूलता किंवा स्थौल्य अशी संज्ञा दिलेलीच होती. पण आजच्या काळात स्थौल्याने गस्त असलेलया व्यक्तींची संख्या ज्या झपाट्याने वाढत आहे तो मात्र एक फार चिंतेचा विषय झालेला आहे. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे अगदी कमी वयातली मुलंसुद्धा या स्थौल्यासारख्या आजाराच्या विळख्यात अडकत आहेत.