

Ayurveda-based guidance for epilepsy management and intestinal inflammation relief through proper treatments and diet.
Sakal
प्रश्न : माझ्या मुलीला गेले दहा वर्षे अधूनमधून एपिलेप्सीचा त्रास होतो. त्रास झाला की तिची डोळ्यांची उघडझाप बंद होते व नंतर काही काळ जिभेला जडपणा येतो. तिला न्यूरोलॉजिस्टची व आयुर्वेदिक औषधे दोन्हीही चालू आहेत. पण आता तिचे लग्न करण्याचा आम्ही विचार करतो आहोत. तर हे पूर्णपणे थांबविण्याकरिता काय करता येऊ शकेल, याच्याकरिता कृपया उपाय सुचवावा.
- जय कुलकर्णी
उत्तर : मेंदू अर्थात मज्जातंतूच्या संबंधित कुठलेही आजार बरे व्हायला थोडेसे अवघड असतात आणि त्यामुळे त्याच्यावर सतत उपचार करणं आवश्यक असतं. तुम्ही करत असलेल्या औषधानं बरोबरच आयुर्वेदिक उपचार जर घेतले तर त्याचाही फायदा मिळू शकेल. त्याकरिता संतुलन पंचकर्म यांसारखे एखादे शास्त्रोक्त पंचकर्म करून आधी शरीरशुद्धी करून घ्यावी व नंतर शिरोधारा, शिरोबस्ती, शिरोपिचू इत्यादी घेण्याचा फायदा होऊ शकतो. त्याकरता एकदा प्रत्यक्ष सल्ला घेतलेला जास्त उत्तम राहील. ह्याच बरोबरीने मदत म्हणून संतुलन चे ब्रह्मलीन घृत घेणे उत्तम. तसेच रोज रात्री झोपताना टाळूवर संतुलन ब्रह्मलीन तेल लावावे व झोपण्यापूर्वी नाकामध्ये संतुलन नस्य सॅन हे सुद्धा एक दोन थेंब टाकणे चांगले राहील. तसेच पादाभ्यंग करणे व स्पिरिट ऑफ हार्मनी, समृद्धी यासारखे स्वास्थ्य संगीत सुद्धा नियमित ऐकण्याचा उपयोग होऊ शकेल.