

Ayurvedic Garbhasanskar program in government hospitals
sakal
डॉ. मालविका तांबे
मा गच्या आठवड्यात सगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये एक महत्वपूर्ण बातमी होती, ती म्हणजे मध्य प्रदेश सरकारने सगळ्या शासकीय रुग्णालयांमध्ये ‘गर्भसंस्कार’ उपक्रम राबवायचं ठरवलं आहे. हे वाचून अतिशय आनंद झाला, कारण डॉ. बालाजी तांबे गेले चाळीस वर्षे आयुर्वेदीय गर्भसंस्कारांवरती काम करत होते आणि पंचवीस वर्षांपूर्वी ‘सकाळ समूहा’च्या सहाय्याने हे गर्भसंस्कार जगभरात सगळीकडे रुजू करण्यात त्यांना यश मिळाले होते. हे गर्भसंस्कार समाजात इतके लोकप्रिय झाले की, फक्त आयुर्वेदिक चिकित्सकच नव्हे तर दुसऱ्याही पॅथीचे चिकित्सक स्वतःच्या रुग्णांना गर्भसंस्कार करू लागले. पण कुठलीही गोष्ट प्रसिद्ध झाली की त्या प्रसिद्धीचा उपयोग सगळेच करायला लागतात.