

Boosting Concentration: Ayurvedic Solutions for Restless Children and Study Focus
Sakal
प्रश्न : सुवर्णसिद्ध जल तयार करण्याकरिता पाणी आणि सोन्याचे प्रमाण किती असावे? पाण्यामध्ये सोन्याचा दागिना किंवा चांदी घालून ठेवलं तर असं जल तयार करता येऊ शकेल का? सोन्या आणि चांदीमध्ये आरोग्याकरता काय जास्त चांगलं राहील?
अनुप निगम, पुणे
उत्तर: पाणी उकळत असताना पाणी आणि सोनं जेवढं संपर्कात येतं तेवढं जास्त उत्तम असतं. त्यामुळे पाण्यामध्ये सोन्याचा पत्रा करून घातलेला जास्त उत्तम राहतो. सोन्याचं आणि पाणीचं असं निश्चित प्रमाण काही नसतं. त्यांच्या दोघांचा संपर्क होणं महत्त्वाचं असतं. सुवर्णसिद्ध जलाच्या माहितीकरता डॉक्टर मालविका तांबे युट्युब चॅनल वरती दिलेली संपूर्ण विधी बघणं उत्तम ठरेल. हे सोनं चोवीस कॅरेट शुद्धीचं असणं गरजेचं असतं. त्यामुळे त्याच्या जागी कुठलाही दागिना वापरून चालत नाही. सोन्याचा पत्रा एकदा बनवून पाणी उकळण्याकरता वापरायला सुरुवात केल्यास तो वर्षानुवर्षे तसाच राहतो. चांदी वापरून अशा प्रकारे पाणी संस्कारित करण्याचा उल्लेख कुठे सापडत नाही. त्यामुळे पाण्यामध्ये चांदी घालून ठेवणं हे सुवर्ण संस्कारित जलाएवढे फायदे देऊ शकणार नाही. सुवर्णसिद्ध जल साठवून ठेवण्याकरता चांदीचे किंवा तांब्याचे स्वच्छ पात्र वापरता येऊ शकते व तसेच पाणी पिण्यासाठी चांदीचा ग्लास वापरलेला जास्त उत्तम राहील.