तर काय..?

मला गेली पाच वर्षे शीतपित्ताचा त्रास आहे. औषधे घेऊन घेऊन मी कंटाळलो आहे. यावर काही उपाय सुचवावा, तसेच पथ्यही सांगावे.
Ayurvedic Tips

Ayurvedic Tips

Sakal

Updated on

मला गेली पाच वर्षे शीतपित्ताचा त्रास आहे. औषधे घेऊन घेऊन मी कंटाळलो आहे. यावर काही उपाय सुचवावा, तसेच पथ्यही सांगावे.

- समीर लघाटे

उत्तर : शीतपित्ताच्या त्रासामध्ये सगळ्यांत महत्त्वाचे असते ते म्हणजे अग्नीचे संतुलन. शरीरात अन्नपचन व्यवस्थित होत असले तर शीतपित्ताचा त्रास कमी होताना दिसतो. सहसा शीतपित्ताच्या त्रासामध्ये अँटिॲलर्जिक गोळ्या दिलेल्या दिसतात. हळूहळू त्यांचाही उपयोग होत नाही. आयुर्वेदामार्फत आपल्याला पित्त संतुलन, अग्निसंतुलन व त्वचेमध्ये उष्णतेमुळे होणारा त्रास कमी करता येऊ शकतो. पित्ताच्या संतुलनासाठी रोज सकाळ संध्याकाळ १-१ चमचा संतुलन गुलकंद स्पेशल नक्की घ्यावे. याचबरोबरीने संतुलन पित्तशांती गोळ्या व संतुलन अविपत्तिकर चूर्ण घेणे उत्तम ठरेल. रात्री झोपताना संतुलनचे सॅनकूल चूर्ण नक्की घ्यावे. त्वचेचा त्रास कमी करण्याच्या दृष्टीने मंजिष्ठासॅन, मंजिसारसारखे औषध वैद्यांच्या सल्ल्याने घेता येऊ शकतील. महिन्यातून २-३ वेळा रात्री झोपताना १० मिली एरंडेल तेल साधारण अर्धा ते एक कप हर्बल चहाबरोबर घ्यावे. यामुळे घरच्या घरी पोट साफ होऊन त्वचा सुधारण्यास मदत होईल. सिमला मिरची, कोबी, फ्लॉवर, आंबवलेले पदार्थ, विरुद्ध आहार उदा. दूध व फळे एकत्र करून घेणे वगैरे आहारातून टाळणे बरे राहील. एकदा संतुलनच्या डॉक्टरांनी भेटून प्रकृतीनुसार आहार व दिनचर्या समजून घेणे श्रेयस्कर ठरेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com